अक्कलकुवा तालुका हगणदारी मुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:38 PM2018-04-09T12:38:21+5:302018-04-09T12:38:21+5:30

Akkalkuwa Taluka's clemency release | अक्कलकुवा तालुका हगणदारी मुक्तीकडे

अक्कलकुवा तालुका हगणदारी मुक्तीकडे

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 9 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यात आज अखेरीस 37 हजार घरांमध्ये शौचालयांची उभारणी झाली आह़े दुर्गम आणि अती दुर्गम भागात घरोघरी स्वच्छ अभियान पोहोचवण्यात प्रशासनाला यंदाच्या वर्षात 100 टक्के यश आले आह़े 
तालुक्यातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीसह दारिद्रय़ रेषेवरील  लाभार्थी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, भूमिहीन मजूर, शारिरिकदृष्टय़ा अपंग कुटुंब प्रमुख, महिला कुटुंब प्रमुख  यागटातील लाभार्थीनी 2013-14 या वर्षापासून शासनाच्या योजनांमध्ये सहभाग नोंदवल्याने तालुक्यात घरोघरी शौचालये उपलब्ध होऊ शकले आहेत़ तालुक्यात पायाभूत सर्वेक्षणानुसार पत्र लाभार्थीनी वैयक्तिक शौचालय बांधकाम करून वापर करत असल्यावर त्यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजने अंतर्गत 12 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस अनुदान देण्यात आले आहे. तसेच रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जॉबकार्ड असणा:या कुटुंबाला देखील 12 हजार रुपये बक्षीस अनुदान देण्यात आले आह़े योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनात सुरु असून तालुक्यात पूर्ण झालेल्या शौचालयांची पाहणी उप मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी आणि गट विकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांनी केली़ शौचालय पूर्ण करणा:या पात्र लाभार्थींना बँक खात्यावर अनुदान देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़ेतालुक्यात अक्कलकुवा, अलीविहिर, भाबलपूर, भगदरी, भांग्रापाणी, बिजरीगव्हाण, ब्राrाणगाव, डाब, डनेल, डेब्रामाळ, देवमोगरा, गंगापूर, गव्हाळी, घंटाणी, होराफळी, जमाना, कडवामहू, काकडखुंट, काठी, खापर, खटवाणी, कोराई, कुकडीपादर, मेवास अंकुशविहिर, मालपाडा, मणिबेली, मोग्रा, मोलगी, मोरांबा, नाला, ओहवा, पेचरीदेव, पिंपळखुटा, पोरांबी, रायसिंगपूर, साकळीउमर, सिंदुरी, सिंगपूर, सोरापाडा, तालंबा, ठाणविहिर, उदेपूर, उमरागव्हाण, वेली, विरपूर, वडफळी, वाण्याविहिर या 48 गटात सव्रेक्षण झाले होत़े 100 टक्के शौचालय बांधकामाचे उद्दीष्टय़ पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात अक्कलकुवा तालुका हगणदारीमुक्त घोषणा होण्याची शक्यता आह़े यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयालयातील अधिकारी वेळोवेळी तालुक्यात भेटी देत आहेत़ दुर्गम भागातील पिंपळखुटा गटात 1 हजार 38, सिंदुरी 1 हजार 57, साकलीउमर 747, वेली 1 हजार 96, उमरागव्हाण 1 हजार 246, कुकडीपादर 483, मोलगी 1 हजार 881, तर मणिबेली गटात 434 घरांमध्ये शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत़ याठिकाणी लाभार्थीनी वेळावेळी पाठपुरावा करून शौचालये बांधून घेतली आहेत़  तालुक्यात 1 हजार 881 शौचालये मोग्रा गटात बांधण्यात आली आहेत़ 
 

Web Title: Akkalkuwa Taluka's clemency release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.