Vidhan Sabha 2019: आला वासुदेव.. घोषणा आणि निष्ठाही बदलते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:57 AM2019-10-03T11:57:24+5:302019-10-03T11:57:30+5:30

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची  शुक्रवार शेवटची मुदत असल्याने निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी देखील ...

Ala Vasudev .. Announcement and loyalty also varies .. | Vidhan Sabha 2019: आला वासुदेव.. घोषणा आणि निष्ठाही बदलते..

Vidhan Sabha 2019: आला वासुदेव.. घोषणा आणि निष्ठाही बदलते..

googlenewsNext

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची  शुक्रवार शेवटची मुदत असल्याने निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. कार्यकर्ते, नेते जोमात आले आहेत. हे पहाता वासुदेवाची स्वारी देखील वेग पकडू लागली आहे. नंदुरबारातील गल्लीबोळात जाण्यापेक्षा वासुदेवाने आज पॉश वस्तीत जाण्याचे ठरविले. त्यानुसार वासुदेव जुन्या पालिका चौकातून पुढे जावू लागला. आमदार कार्यालयाजवळ असलेली गर्दी पाहून तो थोडा थबकला आणि गर्दीतून कानोसा घेवू लागला. आमदार कार्यालयाचे चित्र थोडे पालटले होते. तीन रंगाऐवजी एकच रंग कार्यालयात आणि आजूबाजू दिसून येत होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्ष बदलाचा हा परिणाम होता. कार्यकत्र्याचा गप्पा ऐकण्यासाठी थोडा आत शिरलेला वासुदेवाला विविध चर्चा ऐकवायास मिळाल्या. आता पुढील राजकारण कसे राहील. कशी खिचडी शिजत राहील याबाबत त्याने अंदाज बाधण्यास सुरुवात केली. तिस:या, चौथ्या क्रमांकावर राहणारा पक्ष आता जिल्ह्यात पहिल्या किंवा दुस:या क्रमांकावर कसा येईल याचे गणित कार्यकर्ते मांडू लागले होते. क्षणात पक्षनिष्ठा आणि ध्येय धोरणांचा कसा बदल होतो हे एक बुजूर्ग कार्यकर्ता अनुभवत होता. त्याच्या बोलण्यातून ते जाणवत देखील होते. आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये सहमतीचे राजकारण होऊन सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही समविचारी पक्षांचे प्रय} राहतील हे एकुणच आताच्या परिस्थितीत दिसून आले. परंतु गेल्या अनेक वर्षापासून मनोमनी असलेले, राजकारणात एकमेकांचे कट्टर दुष्मन असलेले कार्यकर्ते एकत्र येतील का? हा प्रश्न एक कार्यकर्ता विचारत होता. असो नेता सांगेल तसे काम करावेच लागेल. त्याच्यावरच आपली उठबस आहे भो.. कशाला डोक्याला ताण घेतो असे सांगून वरिष्ठ कार्यकत्र्याने इतर कार्यकत्र्याना शांत राहण्यास सांगितले. ही चर्चा सुरू असतांनाच नेत्याचे वाहन कार्यालयाशेजारी आले. नेत्यालाच पहाताच कार्यकत्र्यामधील जोश अधीकच संचारला आणि घोषणा सुरू झाल्या. तसे नेत्याने सर्वाना शांत करून काही वरिष्ठ मंडळींची विचारपूस केली. आता कसे कामाला लागायचे याबाबत लवकरच बैठक घेवून धोरण ठरवू या असे नेत्याने सांगितले. आदेशाप्रमाणे काम करायचे. कुणी काहीही सांगितले, कान भरले तरी आपल्या पद्धतीनेच आपण काम करायचे. जास्त उत्साहीपणा दाखवू नका. शिस्तीला महत्व द्या म्हणून नेत्याने कार्यकत्र्याना मार्गदर्शन केले. एव्हाना तेथे कार्यकत्र्यासह रस्त्याने येणा:या-जाणा:यांची गर्दी वाढली होती.  त्यामुळे वाहतुकीचाही फज्जा उडत होता. ट्राफिक पोलिसाची कसरत सुरु होती. वासुदेव हे सर्व गर्दीत उभे राहून न्याहळत होता. काय आणि कसे राजकारण असते. क्षणात कसे बदलते, नेते, पदाधिकारी यांची मार्गदर्शनाची भाषाही कशी बदलत जाते याविषयी वासुदेव विचार करू लागला. तोच नेत्याने सर्व कार्यकत्र्याचा निरोप घेवून आपल्या कार्यालयात जाण्यास निघाले. सोबत काही पदाधिका:यांना चर्चेसाठी आत बोलावले. त्यातच नेत्याचे लक्ष वासुदेवाकडे गेले. वासुदेवाला पहाताच नमस्कार करून कर्मचा:याला बोलावले. वासुदेवाला दान देवून चहा पाजण्यास सांगून नेते कार्यालयात कामाला निघाले..    
    -वासुदेव

Web Title: Ala Vasudev .. Announcement and loyalty also varies ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.