परतीच्या पावसावरच राहणार सर्व मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:43 AM2018-08-23T10:43:32+5:302018-08-23T10:43:39+5:30

सरासरी पावसाची अपेक्षा : जिल्ह्यात आतार्पयत 2 हजार 848 मि़मी़ पावसाची नोंद

All the bees will remain on the return day | परतीच्या पावसावरच राहणार सर्व मदार

परतीच्या पावसावरच राहणार सर्व मदार

Next

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठवडय़ाभरापासून पावसाने हजेरी लावली आह़े त्यामुळे आजअखेरीर्पयत जिल्ह्यात 2 हजार 848 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झालेली आह़े जिल्ह्यात सर्वसाधारणत 5 हजार 15 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात येत असत़े  परंतु सरासरीच्या निम्मेच पाऊस बरसला असल्याने आता परतीच्या पावसावरच जिल्ह्यातील पाणीसाठय़ाची मदार असल्याचे दिसून येत आह़े
जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात सर्वसाधारण 644.80 मि़मी़ , नवापूर 1122.90 मि़मी़, शहादा 686.10 मि़मी़, तळोदा 772.70 मि़मी़, अक्कलकुवा 1027़10 मि़मी़ तर धडगावात 761 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात येत असत़े अशा प्रकारे सर्वसाधारणत 5 हजार 15 मि़मी़ व सरासरी 835.83 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद होत असत़े परंतु जिल्ह्यात आतार्पयत 54 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़े यामुळे जलस्त्रोतांमध्ये काही अंशी वाढ झालेली असली तरी केवळ रंगावली प्रकल्प वगळता एकही प्रकल्प दुथळीभरुन वाहतोय अशी स्थिती नाही़ 
मागील वर्षीही सरासरीपेक्षा कमी पाऊस
मागील वर्षीही पावसाने सरासरी गाठली नव्हती़ 2017 मध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी 835़83 मि़मी़ पावसापैकी 749 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली होती़ 30 सप्टेंबर 2017 र्पयत नंदुरबारात 594 मि़मी़, नवापूरात 965 मि़मी़, शहादा 511 मि़मी़, तळोदा 711 मि़मी़, अक्कलकुवा 877 मि़मी़, धडगाव 836 मि़मी़ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती़ एकूण 89़61 टक्के  इतक्या पावसाची नोंद झाली़
परतीच्या पावसाकडे लक्ष
जिल्ह्यात आतार्पयत 54 टक्के इतक्याच पावसाची नोंद झालेली असल्याने परतीच्या पाऊस दमदार व्हावा व धरण तसेच इतर प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र रिमङिाम पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप दमदार पावसाची अपेक्षा आह़े या पावसामुळे पिकांची काही प्रमाणात स्थिती सुधारली असली तरी, 37 लघुप्रकल्प व 4 मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आह़े परतीच्या पावसाचा कालावधी साधारणत सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरु होत असतो़ त्यामुळे मुळ पावसाळी हंगामाला अद्याप महिना शिल्लक आह़े या दिवसांमध्ये चांगला  पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होतेय़
 

Web Title: All the bees will remain on the return day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.