भटक्या समाजालाही सर्व योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:08 PM2019-08-05T12:08:23+5:302019-08-05T12:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सामाजीक परिवर्तनाचा दिंडीत भटका समाज आजही वंचित आहे. इतर जातींप्रमाणेच भटक्या समाजाला सर्व योजना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सामाजीक परिवर्तनाचा दिंडीत भटका समाज आजही वंचित आहे. इतर जातींप्रमाणेच भटक्या समाजाला सर्व योजना लागू करण्यात येतील, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
भटके विमुक्त हक्क परिषदतर्फे आयोजित वंचित व उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी रविवारी सामाजीक जनजागृती मेळावा नंदुरबारात झाला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, आमदार चंद्रकांत रघुवंशी, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे, प्रदेश कार्याध्यक्ष शंकर माटे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, बंजारा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, सखाराम धुमाळ, कृष्णा जाधव उपस्थित होते.
मेळाव्यानिमित्त भटक्या जमातीतील विविध 53 समाजातील प्रतिनिधींमार्फत महाराणा प्रताप पुतळ्यापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध पारंपारीक लोककलेचे दर्शन झाले. प्रास्ताविकात भटके विमुक्त हक्क परिषदेचे कोषाध्यक्ष पुरूषोत्तम काळे यांनी भटके विमुक्तांचा विविध प्रश्नांचा उहापोह केला. मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले की, भटक्या समाजाने शिक्षणाची कास धरावी, दलित आणि आदिवासींच्या प्रगती प्रमाणेच भटक्या समाजाची शिक्षणातून प्रगती होईल असे त्यांनी सांगितले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भटक्या विमुक्तांचा समस्या आणि प्रश्नांबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी मेळाव्याव्दारे केली. आजच्या मेळाव्यात भटक्या विमुक्तांचा विविध प्रलंबीत प्रश्नांबाबत मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत 19 ठरावांना मंजुरी देण्यात आली.
सुत्रसंचलन राकेश आव्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुपडू खेडकर, रवी गोसावी, रामकृष्ण मोरे, राकेश तमायचेकर, महादू हिरणवाळे, मनोज चव्हाण, बाळासाळेब धुमाळ, वसंत गुंजाळ, तुकाराम लांबोळे, सुरेश जोशी, अशोकगीरी महाराज, योगेश्वर बुवा व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.