गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच टक्के जादा पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:50 PM2020-10-02T15:50:09+5:302020-10-02T15:50:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यावर्षी २५ हजार २१० शेतकऱ्यांना २७३ कोटी नऊ लाख एवढ्या पीक कजार्चे वाटप ...

Allocated five per cent more crop loans this year than last year | गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच टक्के जादा पीक कर्ज वाटप

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच टक्के जादा पीक कर्ज वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यावर्षी २५ हजार २१० शेतकऱ्यांना २७३ कोटी नऊ लाख एवढ्या पीक कजार्चे वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम एकूण उद्दीष्टाच्या ४४ टक्के असून गतवर्षीप्पेक्षा ४५ कोटीने जास्त आहे.
जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक १२ हजार ८५६ शेतकऱ्यांना ८२ कोटी १० लाख कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेने ४८७ शेतकºयांना चार कोटी ९६ लाख तर खाजगी बँकांनी ७९२ शेतकºयांना २१ कोटी ५० लाख, तर राष्ट्रीयकृत बँकांनी ११ हजार ७५ शेतकºयांना १६४ कोटी ५३ लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. गतवर्षी खरीप हंगामात १५ हजार २९३ शेतकºयांना २२८ कोटी ३५ लाख अर्थात उद्दीष्टाच्या ३९ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते.
यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या निदेर्शानुसार तालुका स्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाºयांनी बँक अधिकाºयांना कर्ज वाटप वाढविण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनातर्फे बँकाकडे पीक कजार्चे उद्दीष्ट पूर्ण करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापुढील काळातदेखील कर्ज वाटप वाढविण्यासाठी बँकांनी शेतकºयांना सहकार्य करावे.
लीड बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक आठवड्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. शेतकºयांना पीक कर्ज घेण्यासाठी समस्या येत असल्यास त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील डॉ.भारुड यांनी केले आहे.

Web Title: Allocated five per cent more crop loans this year than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.