अणवस्त्रधारी देश असला तरी शांततेला प्राधान्य-डीआरडीओचे शास्त्रज्ञ देवधर यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:03 PM2019-02-11T18:03:41+5:302019-02-11T18:03:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : इस्त्रो आणि डीआरडीओ या संस्थांमध्ये शास्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्र व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : इस्त्रो आणि डीआरडीओ या संस्थांमध्ये शास्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्र व अणवस्त्रांनी भारत सुसज्ज व स्वयंपूर्ण झाला आहे. जगातील एक महासत्ता म्हणून त्याने स्वत:ची क्षमता विकसित केली असल्याचे गौरवोद्गार डीआरडीओचे शास्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी काढले.
शहरातील वात्सल्य सेवा समिती आयोजित कै. बाळासाहेब पाठक स्मृती व्याख्यानमालेचे दुगार्बाई रघुवंशी शाळेत आयोजन करण्यात आले होते. भारताची संरक्षण सिद्धता या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना देवधर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गिरीश खुंटे, वीरप}ी माधुरी पाटील, वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक उपस्थित होते. प्रसंगी शास्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी इस्त्रो आणि डीआरडीओमध्ये संरक्षणासंदर्भात होत असलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्राrाोस अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती व कार्यक्षमतेबद्दल माहिती दिली. भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करताना सुमारे 12 हजार कि.मी.पयर्ंतच्या टप्प्यात मारा करणा:या आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित केली असल्याचे सांगितले. या सर्व क्षेपणास्त्रांची नावे भारतीय संस्कृतीची ओळख असणा:या पंचमहाभूतांच्या नावावरून ठेवली आली आहे. नाग क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान अमेरिकेकडे नसल्याचे ते म्हणाले. या क्षेपणास्त्रांचा वापर हवेतून करता येणार असल्याने भारत संरक्षणाच्या बाबतीत स्वयंसिद्ध झाला आहे.
सुखोई, तेजस या हलक्?या लढाऊ विमानांबद्दलही त्यांनी माहिती सांगितली. कारगिलच्या लढाईत बोफर्स तोफांमुळे लष्कराला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डीआरडीओने केलेल्या संशोधनाबाबत त्यांनी एक ध्वनिचित्रफित दाखविली. कार्यक्रमात शहरातील मोट्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले तर आभार सेवा समितीचे मंगेश उपासणी यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश जोशी, डॉ.उमेश शिंदे, निरज देशपांडे, युवराज गोसावी, संजय फुलंब्रीकर, चिन्मय अगिAहोत्री, गजानन अहिरे, चतुर ठाकूर, आदींनी सहकार्य केले.