आमावस्येच्या रात्री स्मशानात झाले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:11 PM2018-07-15T12:11:15+5:302018-07-15T12:11:20+5:30

अंनिसचा उपक्रम : नंदुरबारात ‘मन व मनाचे आजार’ यावर व्याख्यान

Amavasya night cemeteries awakened | आमावस्येच्या रात्री स्मशानात झाले प्रबोधन

आमावस्येच्या रात्री स्मशानात झाले प्रबोधन

Next

नंदुरबार : आमावस्येच्या रात्री नंदुरबार येथील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रध्दा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ ‘मन आणि मनाचे आजार’ या विषयावर गुरुवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत़े
समाजात वाढत्या अंधश्रध्दा व त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार दूर करण्यासाठी अंनिसतर्फे हा अभिनव उपक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमाचे उद्घाटन नेहमी प्रमाणे अनोख्या पध्दतीने करण्यात आल़े महिला शाखेच्या कार्यकत्र्या डॉ़ आरुषी सुरैया यांच्या हस्ते पाण्याव्दारे दिवा पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली़ 
त्यानंतर पाण्यावर दिवा कसा पेटला, यामागील वैज्ञानिक कारणे शाखेचे किर्तीवर्धन तायडे यांनी स्पष्ट केल़े मनाचे आजार कशामुळे होतात या विषयावर व्याख्याते तसेच महाराष्ट्र अंनिसचे नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ़ सी़डी़ महाजन यांनी मार्गदर्शन केल़े मागील आठवडय़ात दिल्ली येथे मनाच्या आजारांमुळेच एका कुटुंबातील अकरा लोकांनी आत्महत्या करुन घेतल्याची दुदैवी घटना घडली होती़ 
त्यामुळे मनाचे आजार हे जास्तीत जास्त अंधश्रध्देमुळेच घडत असल्याचे डॉ़ महाजन यांनी सांगितल़े तसेच शाखेचे प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी अशा उपक्रमातून समाजातील सर्वसामान्य मानसाच्या मनातून भूत, आत्मा, आमावस्येची रात्र, ग्रहांची दिशा, दशा यांच्या विषयी असलेल्या अंधश्रध्दा, गैरसमज आदी दूर होण्यास मदत होईल असा आशावाद दर्शवला़ कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकत्र्यानी पुढील आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला़ 
कार्यक्रमासाठी डॉ़ सी़डी़ महाजन, डॉ़ आरुषी सुरैया, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन पाटील, फिरोज खान, दीपक चौधरी, सूर्यकांत आगळे, चंद्रमणी बरडे, जितेंद्र गोसावी, वसंत वळवी, रणवीर पेंढारकर, सोहम टिळंगे, ऋृषिकेश पाटील, प्रथमेश वसावे, वैभव राजपूत आदींनी परिश्रम         घेतल़े 
 

Web Title: Amavasya night cemeteries awakened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.