नंदुरबारला पाणी पुरवठा करणारे ‘आंबेबारा’ ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:36 PM2020-07-27T12:36:14+5:302020-07-27T12:36:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणारे आंबेबारा धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागले आहे. ...

‘Ambebara’ overflow supplying water to Nandurbar | नंदुरबारला पाणी पुरवठा करणारे ‘आंबेबारा’ ओव्हरफ्लो

नंदुरबारला पाणी पुरवठा करणारे ‘आंबेबारा’ ओव्हरफ्लो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणारे आंबेबारा धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.
आंबेबारा धरण गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागले होते. गेल्या दहा ते बारा वर्षात पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवननदीच्या जलप्रवाह ज्या धरणावर अवलंबून आहे ते नवापुर तालुक्यातील खोलघर धरणात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा अद्याप झालेला नाही. यामुळे आंबेबारा आणि खोलघर धरणातील ओसडंणाऱ्या पाण्याचा प्रवाह शिवण नदीत येत असल्यामुळे विरचक प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या यंत्रणा आपले कर्तव्य बजावीत काम करीत असून जलसंपदा विभागातील कर्मचारी आंबेबारा धरणातून सोडलेले पाणी १ एप्रिल ते २० मेपर्यंत कालव्याद्वारे आष्टे गावापर्यंत पोहोचवले आणि शहरवासीयांसाठी ते जलदुत ठरले. संचारबंदी काळात नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे म्हणून पालिकेतर्फे कालवा निरीक्षक रणजीतसिंग राजपूत आणि आर .बी. पाटील या दोघा कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेसाठी नेमण्यात आले आहे.

Web Title: ‘Ambebara’ overflow supplying water to Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.