सातपुडा परिसरात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:10 PM2018-05-15T13:10:58+5:302018-05-15T13:10:58+5:30

सुटय़ांमुळे मुलांचीही मदत : सातपुडय़ातील शेतशिवार व पाडे गजबजले

Amchur making work in Satpura area | सातपुडा परिसरात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

सातपुडा परिसरात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 15 : सातपुडय़ाच्या द:याखो:यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह आंब्याच्या झाडाखाली सावलीचा आधार घेत आमचूर तयार करण्याच्या कामात सध्या व्यस्त  आहेत. शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी गेलेली मुलेही उन्हाळ्याच्या सुटीत घरी परतले असून आमसूल तयार करण्यासाठी त्यांचीही मदत मिळत आहे.
सातपुडय़ात कच्च्या कैरीपासून आमचूर तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील आदिवासी बांधवांच्या घरात, अंगणात, वाडय़ात, झाडाखाली, शेतामध्ये कैरीपासून आमचूर तयार करताना संपूर्ण कुटूंब दिसून येत आह़े अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी, डाब, जमाना, साकळीउमर, पिंपळखुटा, वडफळी, तसेच धडगाव तालुका व गुजरात राज्यातील डेडीयापाडा परिसरातील गाव पाडय़ांवर आमचूर तयार करण्यात येतो़ मात्र आमचूरची बाजारपेठ फक्त मोलगी व धडगाव येथेच आहे आणि याठिकाणीच व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे मोलगी व वडफळी परिसरातील आमचूर विक्रेते मोलगी बाजारपेठेत तर धडगाव परिसरातील आमचूर विक्रेते धडगाव बाजारपेठेत आमसूलची विक्री करीत असतात.
बाजारपेठेत आमचूर 160 रुपयांपासून तर 250, 300 रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. कच्च्या कैरींचा हंगाम सुरू झाल्यानंतर सातपुडय़ाच्या द:याखो:यात तसेच परसबाग आणि शेतबांधावरील आंब्याच्या झाडांना लागलेल्या कै:या तोडून त्यापासून आमचूर तयार करण्याच्या कामांना सुरूवात होत़े ज्यांची आंब्याची झाडे नाहीत अशांकडून गावोगावी फिरुन आंब्याची झाडे शोधून, झाडावर लागलेल्या कै:यांची खरेदी करण्यात येत़े चार ते पाच हजार रुपयांपासून तर 10 ते 15 हजार रूपयांर्पयत झाडावरील कै:यांची खरेदी करण्यात येत़े कैरी खरेदी केल्यावर, झाडावरून कै:या तोडून त्या झाडाखालीच आदिवासी बांधव संपूर्ण  कुटुंबासह सावलीत बसून आमचूर तयार करतात यासाठी त्यांचा रात्रंदिवस पडाव तिथेच असतो. 
कच्च्या कैरीपासून आमचूर व कैरीमध्ये निघणारी कोहळी व कोहळीमधील गरदेखील विक्री होतो. फोडलेली कोहळी पाच रुपये किलो व कोहळीमधील गर तीन ते चार रुपये किलोने विक्री होतो.
 

Web Title: Amchur making work in Satpura area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.