30 किलो सोने, 18 किलो चांदी व सुंदर बायकोचे दिले अमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:01 PM2018-09-28T12:01:56+5:302018-09-28T12:02:01+5:30
तांत्रिक बाबाची अघोरी पूजा : सुशिक्षीत युवक पडले बळी, आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत असलेले युवक व त्यातील काहींचे लगA जमत नसल्याच्या त्रागातून तांत्रिक बाबाला गाठण्यात आले. आणि त्यातूनच अघोरी पुजा केली गेल्याचे पुढे आले आहे. तांत्रिक बाबाने 30 किलो सोने, 18 किलो चांदी व ज्यांचे लगA झाले नाही त्यांना सुंदर बायको मिळवून देण्याचे दिलेले अमिष आणि त्यातून घडलेल्या पुढील नाटय़ाची चर्चा सध्या नंदुरबारसह जिल्हाभरात सुरू आहे. सुशिक्षीत युवकांकडूनच हे कृत्य घडावे याबाबत मात्र आश्चर्यही व्यक्त होत आहे.
नंदुरबारातील बाबा गणपतीच्या मागे राहणा:या अमोल सोनार यांच्या घरी अघोरी पुजा झाल्याचा व त्यातून नरबळी देण्याचा प्रयत्न होणार असल्याची बाब उघड झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबासह त्याला पुजेसाठी आणणा:या अमोल प्रविण सोनार यांना अटक केली आहे. ज्या व्यक्तीच्या मध्यस्थीतून हा बाब पुजेसाठी आला त्या ‘मामा’लाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यालाही सहआरोपी करण्याबाबत पोलीसांची चाचपणी सुरू आहे.
आर्थिक विवंचना आणि लगAाचे कारण
पुजेसाठी बसलेले अमोल सोनार यांच्यासह इतर युवक हे आर्थिक विवंचनेतून जात असल्याचे त्या भागातील चर्चेतून समजले. शिवाय त्यांच्यातील दोघांचे लगA देखील झालेले नाही. आर्थिक विवंचना दूर व्हावी व लगA जमावे यासाठी त्यांना कुणीतरी पुजाविधी करण्याचे सांगितले होते. त्या माध्यमातून त्यांनी पुजेसाठी मांत्रिकाचा शोधाशोध केला असता नंदुरबारातीलच मंगळ बाजारात राहणा:या एका व्यापा:याने त्यांना सुरुपसिंग नाईक या मांत्रिक बाबाचे नाव सांगितले. या बाबाला पुजेसाठी आणण्याचे सहा हजार रुपये लागतील असेही या मध्यस्थाने सांगितले. त्यानुसार पैसे देण्यात आले. सहा हजारातून साडेचार हजार रुपये मांत्रिकाला व दीड हजार रुपये मध्यस्थाने घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. पुजाविधीसाठी अमोल सोनारसह त्याचे इतर नातेवाईक युवक बसले. त्यांनी नात्यातीलच परेश सोनार या युवकाला देखील बोलावले. त्याला काहीही माहिती नसतांना त्याला पुजेसाठी बसविण्यात आले.
बाबा व मध्यस्थाच्या अमिषाला बळी पडले युवक
मांत्रिक बाबाने आपल्या पुजेच्या माध्यमातून किमान 30 किलो सोने, 18 किलो चांदी काढून देणार. तसेच ज्यांचे लगA झालेले नाही त्यांचे लगA तर जमणारच, परंतु सुंदर बायको देखील मिळणार असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून ही पुजा करण्यात आली. पुजा करण्यासाठी अमोल सोनार यांच्या घरातील एका रुममध्ये सर्व पाचही युवकांना विवस्त्र करण्यात आले. कंबरेचा करदोडा, हातातील दोरे, कानातील बाळ्या, बोटातील अंगठय़ा, गळ्यातील चेन काढून घेण्यात आली. साधरणत: अर्धातास पुजा झाली. पुजेनंतर त्यांना तिर्थ पिण्यास दिले. या पूजेसाठी नंदुरबारातीलच एका दुकानातून साहित्य खरेदी करण्यात आले होते.
उलटय़ा व पोटदुखी
परेश यांना तिर्थ पिल्यानंतर व पुजाविधी झाल्यानंतर त्रास होऊ लागला. उलटय़ा व पोटदुखी होत असल्याचे त्याने घरातील व्यक्तींना सांगितले. पुजाविधीनंतरच हा त्रास होत असल्याचे त्याने सांगितल्यानंतर घरच्या लोकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि हे बिंग फुटले.
बाबाने यापूर्वीही केल्या आहेत नंदुरबारात पूजा
अटक करण्यात आलेल्या सुरुपसिंग नाईक या मांत्रिकाने यापूर्वीही नंदुरबारात काही ठिकाणी पूजा केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी आता जो मध्यस्थ होता तोच यापूर्वीच्या पूजेमध्ये देखील मध्यस्थ असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे यापूर्वी कुठेकुठे पुजा झाल्या, त्यात काय काय झाले. नरबळीची तेथेही मागणी करण्यात आली होती किंवा कसे याचा तपास आता पोलीस करीत आहे.