पाणीपुरवठय़ासाठी आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:51 AM2019-02-15T11:51:19+5:302019-02-15T11:51:24+5:30

नंदुरबार :  शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील मर्यादीत पाणीसाठा लक्षात घेता आंबेबारा धरणातील पाणी आता मदतीला धावून आले ...

Ampara's base for water supply | पाणीपुरवठय़ासाठी आंबेबाराचा आधार

पाणीपुरवठय़ासाठी आंबेबाराचा आधार

Next

नंदुरबार :  शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील मर्यादीत पाणीसाठा लक्षात घेता आंबेबारा धरणातील पाणी आता मदतीला धावून आले आहे. आष्टे पंपींग स्टेशनवरील विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने आंबेबारा धरणातील पाणी नदीतून चारीद्वारे या विहिरीत आणले जात आहे. दरम्यान, या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पालिकेने उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनीही पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. 
नंदुरबार शहराला मुख्यत्वे शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. 30 टक्के पाणीपुरवठा आंबेबारा धरणातून केला जातो. त्यामुळे दरवर्षी या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठा पालिकेतर्फे आरक्षीत करण्यात येतो. यंदा पजर्न्यमान कमी झाल्याने दोन्ही प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे विरचक आणि आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा यंदा पालिकेने आरक्षीत केला आहे.
विहिरीची पातळी खोल
विरचक प्रमाणेच आष्टे शिवारात शिवण नदीवर पालिकेचे पंपींग स्टेशन आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीतून पाणी उपसा केला जातो. सध्या तेथील पाणी पातळी खोल गेली आहे. परिणामी आंबेबारा धरणातून शिवण नदीत चारीद्वारे आष्टे विहिरीजवळ पाणी आणले जात आहे. तीन दिवसांपूर्वी आंबेबारा धरणातून पाणी सोडण्यात आले  होते. 
गुरुवारी दुपारी हे पाणी विहिरीजवळ आले. या धरणात यंदा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. आताच्या परिस्थितीत तेथे 50 ते 55 टक्के पाणीसाठा आहे. हा संपुर्ण पाणीसाठा यंदा पालिकेने आरक्षीत केला आहे. त्यामुळे या धरणातून रब्बीसाठी पाण्याचे आवर्तण सोडण्यात आलेले नाही. आंबेबाराचे पाणी नियोजनानुसार सोडल्यास किमान मे र्पयत ते पुरणार आहे.
विरचकमधून नियमित पुरवठा
विरचक प्रकल्पातून नियमित पाणीपुरवठा होत आहे. या    प्रकल्पात यंदा 41 टक्के पाणीसाठा झाला होता. सद्य स्थितीत या प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. सध्या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेली उपसा विहिरीर्पयत धरणातील     पाणी आहे. पुढील काळात पाणी कमी झाल्यावर या ठिकाणी देखील धरण ते उपसा विहिर या दरम्यान  चारी करून पाणी आणावे लागणार आहे. 
विरचक प्रकल्पातील  पाणीसाठा लक्षात घेता जून ते जुलै महिन्यार्पयत नियोजनानुसार पाणीपुरवठा करता येवू शकणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे.  नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या या दोन्ही प्रकल्पात यंदा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यार्पयत पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान पालिकेला आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करून ठेवण्यात आले आहे. 
शहरात असलेल्या पालिकेच्या कुपनलिकांमधून देखील  पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अशा कुपनलिकांची देखील  देखभाल आणि दुरूस्तीकडे पालिकेला लक्ष द्यावे लागणार आहे. 
 

Web Title: Ampara's base for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.