अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:23 PM2019-10-19T12:23:53+5:302019-10-19T12:24:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीपूर्वी वाढीव मानधनाची थकबाकी मिळावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन ...

Analytica | अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवाळीपूर्वी वाढीव मानधनाची थकबाकी मिळावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केल़े दरम्यान सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल़े 
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे थाळीनाद आंदोलन करण्यात आल़े यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात, दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचा:यांना मानधन वाढीची थकबाकी रक्कम ताबडतोब देण्यात यावी, हजेरीचे दिवस विचारात मानधन अदा करण्यात यावे, 7 सप्टेंबर 2019 रोजी काढलेला शासनाचा आदेश ताबडतोब रद्द करावा, दिवाळीपूर्वी गणवेश, सादिल खर्च अदा करा, बँकेत आधार लिंक नसलेल्या कर्मचा:यांना दिवाळीपूर्वी ऑफलाईन मानधन द्यावे, मोबाईल रिपेअरींग व मोबाईल हरवल्यास रक्कम अंगणवाडी कर्मचा:यांकडून वसुली करण्याचे आदेश आयुक्त यांनी काढले आहेत ते रद्द करावेत, दिवाळीपूर्वी भाऊबीज बोनस देण्याचे आदेश काढण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावरील मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होत़े त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्यात येऊन स्थानिक स्तरावरील अडचणी तातडीने सोडवण्याचे सांगण्यात आल़े तर राज्यस्तरीय समस्यांबाबत शिफारस करण्याचे आश्वासन देण्यात आल़े   
यावेळी संघटननेचे युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, रविंद्र ब्राrाणे, राजू पाटील, अमोल बैसाणे, लता वसावे, सबु पवार, विद्या मोरे, संध्या पाटील, इंदिरा पाडवी, वर्षा पवार, वर्षा चौधरी, मोहिनी पाटील, कमल शिंदे उपस्थित होत्या़ 
 

Web Title: Analytica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.