अंगणवाडी कर्मचा:यांचे मागण्यांसाठी नंदुरबारात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:41 PM2018-08-24T12:41:35+5:302018-08-24T12:41:42+5:30
नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.
सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचा:यांच्या भरतीवरील र्निबध तातडीने उठवावेत आणि अल्प उपस्थितीच्या अंगणवाडय़ांचे एकत्रीकरण करू नये. कर्मचारी कपातही करू नये. कर्मचा:यांना पुर्णवेळ काम देवून शासकीय, निमशासकीय कर्मचा:यांचा दर्जा द्यावा. सेवासमाप्ती लाभामध्ये सुधारणा करावी. भाऊबिज भेटीच्या रक्कमेमध्ये वाढ करावी. दरवर्षी मानधनात 20 टक्के वाढ करावी. सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वारसदारांना सामावून घ्यावे. केंद्र स्तरावर मिळणारा परिवर्तनीय निधी व गणवेशाच्या रक्कमेत वाढ करावी. इतर महिला कर्मचा:यांप्रमाणे अंगणवाडी कर्मचा:यांना बालसंगोपनाची रजा लागू करावी यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, राजू पाटील, नयना मराठे, लता गावीत, प्रतिभा पाटील, यमुना पाटील, मोहिनी पाटील आदी सहभागी झाले.