पुलाचे काम रखडल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:46 PM2019-01-22T12:46:12+5:302019-01-22T12:48:21+5:30
चिंचपाडा : ग्रामस्थांना 18 किमीचा घालावा लागतो वळसा, काम थांबवल्याने समस्या
चिंचपाडा : चिंचपाडा ता़ नवापूर येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असल्याने सर्वसामान्यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील या उड्डाणपुलासह रायंगण नदी, गंगापूर नदीवरील पुलाचे कामही रखडत असल्याने दळणवळणाची गती वाढविण्यासाठी उर्वरीत काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या पुलाचे काम रखडले असल्याने ग्रामस्थांना विसरवाडीला जाण्यासाठी जुन्या महामार्गावरुन वाहतूक करावी लागत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेरुन 18 किलो मीटरचा वळसा घालत विसरवाडीला जावे लागत आह़े यामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्हींची बचत होणार आह़े
रोजंदार व विद्याथ्र्याचे हाल
विसरवाडी तसेच लगतच्या गावातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तर रोजंदार आपआपल्या कामानिमित्त तालुक्याला जात असतात़ त्यामुळे त्यांना पुलाअभावी मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े रायंगण नदी, गंगापूर नदी तसेच रेल्वे मार्गावरील पुल या तिन्ही पुलांचे काम झाल्यास त्याचा 18 किमीचा फेरा वाचणार आह़े
जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी
तिन्हीही पुलांचे काम रखडले असल्याने साहजिकच जुन्या महामार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आह़े एकाच मार्गावर दळणवळण व्यवस्था अवलंबून असल्याने साहजिकच या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असत़े
त्यातच, सकाळ व सायंकाळ तर जुन्या महामार्गावर मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असत़े त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वेळावेळी वाढ होत असत़े दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी त्यानुसार वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ नोकरदार व विद्याथ्र्यासह शेतक:यांनाही तालुक्याच्या ठिकाणाहून आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी मोठी अडचण होत आह़े या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यास शेतक:यांनाही सोयीचे होणार आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े