नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने जीवनमान उंचावेल - अनिल काकोडकर
By admin | Published: June 20, 2017 05:54 PM2017-06-20T17:54:01+5:302017-06-20T17:54:01+5:30
नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपण आपली उपजिविका भागवू शकतो असे, प्रतिपादन अनिल काकोडकर यांनी केल़े
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.20 - दैनंदिन जीवनात उपलब्ध ज्ञानाचा, पारंपरिक ज्ञानाचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपण आपली उपजिविका भागवू शकतो असे, प्रतिपादन ऊर्जा आयोगाचे सदस्य व राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी श्रावणी येथे केल़े
नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे डॉ़ हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार आणि नेसू परिसर सेवा समिती खांडबारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी क्षेत्रातील समन्वित विकास प्रयोग पाहणी व प्रयोगशिल शेतकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता़ यावेळी डॉ़ काकोडकर बोलत होत़े यावेळी हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील, डॉ़ गजानन डांगे उपस्थित होत़े
डॉ़ काकोडकर म्हणाले की, आपण ज्या भागात आहोत तेथे कधी कधी उपजिविकेचे साधन आटतात, किंवा कमी होतात आणि मग उपजिविका चालू शकत नाहीत़ म्हणून आपण दुसरीकडे उपजिविकेसाठी स्थलांतर करतो़ स्थलांतराची समस्या सर्वदूर असून ही न थांबवता येणारी प्रक्रिया आह़े असे जरी असले, तरी या परिस्थितीवर मात करण्यासाठी नवीन साधनांचा, तंत्रज्ञानाचा उपयोग करावा़ येथील शेतकरी स्वत: कार्यरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येत असल्याचे ते यावेळी म्हणाल़े
तत्पर्वी डॉ़ अनिल काकोडकर यांनी द्रौपदी महिला बचत गट निंबोणी यांच्या सुविधा केंद्रातील शेती औजार व साई पुरूष शेतकरी गट श्रावणी यांच्या दाळ मिल प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी केली़ व प्रयोगाबाबतची माहिती जाणून घेतली़