कंजाणी येथे पशुपालन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:38+5:302021-01-15T04:26:38+5:30

या कार्यक्रमात डॉ. मुरलीधर महाजन, धनराज चौधरी, डॉ.गणापुरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चौधरी यांनी दुधापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवावे ...

Animal Husbandry Meet at Kanjani | कंजाणी येथे पशुपालन मेळावा

कंजाणी येथे पशुपालन मेळावा

Next

या कार्यक्रमात डॉ. मुरलीधर महाजन, धनराज चौधरी, डॉ.गणापुरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चौधरी यांनी दुधापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवावे व त्या वस्तूंची विक्री आणि आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.गणापुरे यांनी पशुपालन व चारा व्यवस्थापन कसे करावे याबाबत तर डॉ. महाजन यांनी शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय अधिक सुधारित पद्धतीने करून जंगलाचे संरक्षण व जतन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास बिजरीगव्हाणचे सरपंच रोशन दिनकर पाडवी, कंजालाचे रामसिंग वळवी, पं.स.च्या माजी सभापती रुषाबाई वळवी, गेनाबाई पाडवी, वेलीचे माजी सरपंच खुमानसिंग पाडवी, मोलगीचे माजी सरपंच सामा पाडवी, भगदारीचे चंद्रसिंग पाडवी आदी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला यांनी केले होते. या फिरत्या कार्यक्रमाचे पुढील आयोजन १ फेब्रुवारीला भगदरी येथे करण्यात आले आहे.

Web Title: Animal Husbandry Meet at Kanjani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.