माळखुर्द येथील अंकिताच्या चेह:यावर आले स्मितहास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:25 PM2018-02-18T12:25:34+5:302018-02-18T12:25:40+5:30
दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम
नारायण जाधव ।
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तळोदा तालुक्यातील माळखुर्द गावातील अंकिताच्या चेह:यावर स्मितहास्य आले आह़े विशेष म्हणजे माळखुर्दर्पयत जाण्यास कुठलेही वाहन नसताना 10 किमी पायपीट करीत आरोग्य विभागाचे कर्मचारी तिथर्पयत पोहचले आहेत़
दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर रुप धारण करीत आह़े याचेच एक उदाहरण म्हणून माळखुर्दकडे बघता येईल़ या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही़ परिणामी वाहनव्यवस्थादेखील अद्याप पोहचली नाही़ त्यामुळे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाच्या पथकाने पायपीट करुन माळखुर्द गाठल़े गावातील सहा वर्षाआतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ त्यात, अंकिता राजेंद्र वळवी ही बालिका दुभंगलेले ओठ व टाळूसोबत आढळून आली़ गेल्या काही वर्षापासून ती याच परिस्थितीत वाढत होती़ यामुळे तिच्या चेह:यावरील हास्यच जणू कोणीतरी हिरावून घेतले असल्याची भावना तिच्या पालकांमध्ये होती़ परंतु अशिक्षीतता व खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने अंकिता व तिच्या पालकांनीही आहे त्या परिस्थितीसोबत पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु आरोग्य कर्मचा:यांच्या येण्याने अंकितासह तिच्या पालकांच्याही आशा पल्लवीत झाल्या़ पथकातील डॉ़ विजय पाटील, डॉ़ सुनील लोखंडे, पर्यवेक्षिका कविता अहिरराव तसेच कर्मचा:यांनी अंकिताच्या पालकांना शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली़ यानंतर अंकितादेखील इतर सामान्य मुलांप्रमाणे दिसेल असा विश्वास दिला़ त्यामुळे याला पालकांचीही सहमती मिळाली़