जिल्ह्यात सर्वत्र बरसला पेरणीलायक पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:13 PM2019-07-06T12:13:08+5:302019-07-06T12:13:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जून मध्यानंतर यथातथाच कोसळणा:या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली़ परिणामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जून मध्यानंतर यथातथाच कोसळणा:या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली़ परिणामी 24 तासात जिल्ह्यात 116 मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि शहादा तालुक्यात यंदाच्या हंगामात प्रथमच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़
जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपार्पयत सरासरी 116़50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े नंदुरबार 90, नवापुर 62, शहादा 135, तळोदा 142, अक्कलकुवा 146 आणि धडगाव तालुक्यात 124 मिलीमीटर पाऊस कोसळल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ दरम्यान शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला होता़ रात्री उशिरार्पयत ठिकठिकाणी पाऊस बरसत होता़ जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला असून कापूस दुबार पेरणीचे संकट टळल्याचे सांगण्यात येत आह़े पावसामुळे जमिनीची वाफ होण्यास मदत होणार असून पावसाने उघडीप दिल्यानंतर तात्काळ शेतीकामे सुरु होणार आहेत़