नंदुरबारच्या युवकाने तयार केले कोरोनाची लक्षणे सांगणारे अॅप व कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:22 PM2020-07-15T12:22:57+5:302020-07-15T12:23:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंजिनियर असलेल्या युवकाने लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत कोरोनाची लक्षणे शोधून माहिती देणारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील इंजिनियर असलेल्या युवकाने लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत कोरोनाची लक्षणे शोधून माहिती देणारे मोबाईल अॅप आणि कीट तयार केले आहे़ अत्यल्प खर्चात तयार केलेले कीट आणि अॅप शरीरातील आॅक्सिजन व इतर घटकांची मात्रा सांगून कोरोनाचा अलर्ट देणार आहे़
योगेश अहिरे या उद्यमी युवकाने हे अॅप आणि कीट डेव्हलप केले असून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या योगेश याने शहरात स्टार्ट अप अंतर्गत पहिला बीपीओही सुरू केला आहे़ यांतर्गत अनेकांना रोजगार मिळवून दिला असताना ग्रामीण भागातील युवकांना आॅनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या मोबाईलच्या डेव्हलपिंग तो काम करत आहे़ दरम्यान मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर योगेश अहिरे याने कोरोनाची लक्षणे सोप्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी समोर येतील यासाठी एखादे अॅप डेव्हलप करण्याचे निश्चित केले होते़ त्यावर करत असताना त्याला आयएम हेल्दी हे अॅप आणि कीटची संकल्पना सुचली़ आॅक्सिमिटर आणि फिव्हर यांची माहिती देणाºया दोन यंत्रांचे एकत्रित मॉडेल तयार करुन त्याची माहिती वापरकर्त्याच्या मोबाईलवर देण्याचा अनोखा प्रयोग त्याने यशस्वी करत हे कीट बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ आॅगस्ट महिन्यात हे कीट बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती योगेश याने पत्रकार परिषदेत दिली आहे़
यावेळी त्याने सांगितले की, या कीटच्या बनावटीचा कारखाना नंदुरबारात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे़ अल्प खर्चात तयार केलेल्या कीटमध्ये ५ व्होल्टचे चार्जर, दोन बॅटरी लावण्यात आली असून युव्ही लाईट चीपमुळे एकाने थंब केल्यावर त्याला सॅनेटाईज करण्याची गरज भासणार नाही़ एखाद्याकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्यास अॅडमिन असलेल्या व्यक्तीच्या मोबाईमध्ये शरीरातील विविध रिडिंग्स देण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे़
बायोमेट्रिक थंब मशिनप्रमाणेच असलेल्या या कीटमधील मशिनवर बोट ठेवल्यानंतर शरीरातील ताप, रक्तदाब, आॅक्सिजनचे प्रमाण याची माहिती मिळणार आहे़ ही माहिती मोबाईलमध्ये संकलित होवून ती आरोग्य विभाग किंवा फॅमिली डॉक्टरपर्यंतही पोहोचणार आहे़
या डेमो मॉडेलचे सादरीकरण योगेश अहिरे याने जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले होते़
तयार करण्यात आलेल्या या अॅपचे कॉपीराईट तर कीटला आयसीएमआर या संस्थेने नॉर्मल मेडिकल डिव्हाईस म्हणून मान्यता आहे़ आॅक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंगप्रमाणेच हे काम करणार आहे़ शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यासह गर्दीच्या ठिकाणी हे कीट व अॅप उपयोगी ठरणार आहे़