अॅपद्वारे वाहनविक्रीचा बनाव करत एकास लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:48 PM2019-10-26T12:48:12+5:302019-10-26T12:48:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईल अॅपवर पाहिलेले स्वस्तातील जुने वाहन खरेदी करण्यासाठी संपर्क करणा:या एकाची फसवणूक झाल्याचा प्रकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोबाईल अॅपवर पाहिलेले स्वस्तातील जुने वाहन खरेदी करण्यासाठी संपर्क करणा:या एकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आह़े सप्टेंबर महिन्यातील फसवणूक प्रकरणी 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला आह़े
बापू गटलू पाटील रा़ लक्ष्मी नारायण नगर, नंदुरबार असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आह़े बापू पाटील यांनी 14 सप्टेंबर रोजी मोबाईलवर ओएलएक्स आर्मी ट्रान्सपोर्ट या अॅपवर वाहन पसंती करुन खरेदीसाठी नोंदणी केली होती़ यातून त्यांच्यासोबत गणेश काळे रा़ अहमदाबाद व आर्मी ट्रान्सपोर्टचा चालक अशा दोघांनी संपर्क करुन पेटीएम खात्यात पैसे टाकण्यास सांगितले होत़े यानुसार बापू पाटील यांनी वेळोवेळी 74 हजार 300 रुपये त्यांच्या खात्यावर टाकून दिले होत़े यानंतरही दोघेही संपर्काबाहेर गेल़े
संशयित गणेश काळे व एक अनोळखी अशा दोघांविरोधात बापू पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़