वेलदा गावाला आले पोलीस छावनीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:40 PM2020-07-23T12:40:12+5:302020-07-23T12:40:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वेलदा येथे दवाखान्याचे साहित्य जाळणे, पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयीताची धरपकड सुरू केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वेलदा येथे दवाखान्याचे साहित्य जाळणे, पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयीताची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
राज्याच्या सिमेवरील वेलदा येथे मंगळवारी एका खाजगी दवाखान्यातील साहित्य जाळून टाकण्याची घटना घडली होती. डॉक्टरांनी प्रकृती खालावलेल्या वृद्धेवर घरी जाऊन उपचार केला नाही. रात्री वृद्धा मरण पावली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी संबधीत दवाखान्याची तोडफोड करीत साहित्य चौकात आणून जाळले होते. तर घटनास्थळी आलेल्या पोलिसांवर जमावाने चाल केली होती. त्यात फौजदार व एक कर्मचारी जखमी झाले होते. मंगळवारी सायंकाळपासून गावात बंदोबस्त लावण्यात आला होता. बुधवारी संशयीतांची धरपकड सुरू करण्यात आली होती. गावात पोलीस छावनीचे स्वरूप आले आहे.
घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून संशयीतांना अटक करण्यात येत असल्याची माहिती निझर पोलिसांनी दिली.