ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 03:14 PM2020-12-23T15:14:08+5:302020-12-23T15:14:22+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला ...

Appointment of Election Officers for Gram Panchayat Elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची  नियुक्ती केली आहे. येथील तहसील कार्यालयात बुधवारपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार असून त्यासाठी १६ टेबल लावण्यात आले आहेत.
              शहादा तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायतींच्या  ८९ प्रभागातून २४५ सदस्यांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्णत्वास आली आहे. दरम्यान, बुधवार, २३ डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार असून इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. त्यात ग्रामपंचायतीचा दाखला, जातीचा दाखला आदींसह विविध कागदपत्रांची जुळवणी सुरू आहे. कागदपत्र जुळवण्यात विशेषत: युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या निवडणुकीत युवक मोठ्या प्रमाणावर उमेदवारी करतील, असे निदर्शनास येत आहे. गावागावांमध्ये वातावरण तापले असून काही ठिकाणी इच्छुकांची मनधरणी करण्यामध्ये पॅनल प्रमुखाला आपला वेळ द्यावा लागत आहे. हा आपला तो परका असा भेदभाव गावागावात दिसून येत आहे. एकूणच निवडणुकीची ईर्षा इतक्या टोकाला गेल्याचे जाणवते. तालुक्यात बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये सरळ लढती होणार हे मात्र निश्चित. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. उद्यापासून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यासाठी येथील जुना मोहिदा रस्त्यावरील नूतन तहसील कार्यालयात १६ टेबलांवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यात अर्ज तपासणी,  डिपॉझिट व  इतर बाबींची तपासणी होणार आहे. तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली कामकाज सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना निवडणूक अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. नंतर त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात प्रिंटसह इतर कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. १६ टेबलांवर ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
             ग्रामपंचायतनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी असे : कुकावल, कोठली त.सा.- व्ही.एस. जडे (शाखा अभियंता, पंचायत समिती शहादा), कुऱ्हावद त.सा., कौठळ त.सा.- एच.बी. भोई (शाखा अभियंता, पंचायत समिती शहादा), दोदवाडे, फेस- सी.एस. निकुंभ (विस्तार अधिकारी, शिक्षण, पंचायत समिती शहादा), नांदरखेडा, शेल्टी- आर.एस. सासोटे (कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती शहादा), वर्ढे त.श., टेंभे त.श.-  केदारेश्वर गिरासे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, शहादा), मनरद, डामरखेडा-  बी.एस. सूर्यवंशी (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत), बामखेडा त.त.- मुकेश चव्हाण (मंडळ अधिकारी, प्रकाशा), तोरखेडा, हिंगणी- जुबेर पठाण (मंडळ अधिकारी, सारंगखेडा), पुसनद, सोनवद त.श.- जी.आर. पाटील (कृषी मंडळ अधिकारी), टेंभे त.सा.-  एम.के. सौंदाणे (कृषी मंडळ अधिकारी), मोहिदे त.श.- एम.आर. देव (विस्तार अधिकारी कृषी), सारंगखेडा- सुनील नथ्थू गावीत (कृषी मंडळ अधिकारी), कानडी त.श., बामखेडा त.सा.- निशीगंधा साळवे (मंडळ अधिकारी असलोद), राणीपूर- निकीता नायक (मंडळ अधिकारी, ब्राह्मणपुरी), कोटबांधणी, नागझिरी- बी.बी. सूर्यवंशी (मंडळ अधिकारी  म्हसावद), असलोद, न्यू असलोद- व्ही.डी. साळवे (मंडळ अधिकारी वडाळी).

Web Title: Appointment of Election Officers for Gram Panchayat Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.