उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: July 12, 2023 18:28 IST2023-07-12T18:28:09+5:302023-07-12T18:28:28+5:30
पाच टीएमसी पाणी उकाईच्या बॅकवॉटरमधून घेण्यास मंजुरी मिळाली होती.

उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी
नंदुरबार : उकाईच्या बॅकवॉटरमधून महाराष्ट्राच्या हिश्श्यातील पाच टीएमसी पाणी उचलण्यासाठी उपसा योजना राबविण्याकरिता सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सरदार सरोवर प्रकल्पातून महाराष्ट्राला ११ टीएमसी पाणी मिळणार आहे.
त्यातील पाच टीएमसी पाणी उकाईच्या बॅकवॉटरमधून घेण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र हे पाणी उचलण्यासंदर्भात अद्यापपर्यंत महाराष्ट्राने उपाययोजना केल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर पाच टीएमसी पाणी उपसा योजनेद्वारे उचलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याच्या सर्वेक्षणासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच त्यासंदर्भातील कामाला सुरुवात होणार आहे.