मध्यरात्री दारू पिऊन आरडाओरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:02 PM2021-01-03T13:02:20+5:302021-01-03T13:02:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथे दारू पिऊन आरडाओरड करून सार्वजनीक शांततेचा भंग केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथे दारू पिऊन आरडाओरड करून सार्वजनीक शांततेचा भंग केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, शहादा येथे धान्य मार्केट व मोहिदा चौफुली येथे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री व १ जानेवारीच्या उत्तर रात्री दरम्यान दारू पिऊन आरडाओरड केल्याचा प्रकार घडला. हे सर्वजण ३१डिसेंबर साजरा करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात गणेश परशुराम न्हावी, रा.शहादा, दिपक राजेंद्र सोनवणे, चेतनकुमार जगन्नाथ पाटील, चारूदत्त गणेश पटेल, सचीन भिकन मराठे, दिपक हिरालाल जावरे, अजय अरविंद चौधरी, शुभम शांतीलाल कुवर, योगेश जगतसिंग गिरासे, दिपक वसंत देवरे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
या सर्वांवर दारूचे सेवन करून तोंडाला मास्क न लावता सार्वजिनक ठिकाणी आरडाओरड करणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे यासह इतर कलमान्वये शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.