प्रतापपूर परिसरात बिबटय़ाच्या भीतीने शेतीकामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:41 PM2019-09-02T12:41:18+5:302019-09-02T12:41:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर परिसरात बिबटय़ाचा  पुन्हा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...

In the area of Pratappur, Bibtaya fears kept agriculture | प्रतापपूर परिसरात बिबटय़ाच्या भीतीने शेतीकामे रखडली

प्रतापपूर परिसरात बिबटय़ाच्या भीतीने शेतीकामे रखडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर परिसरात बिबटय़ाचा  पुन्हा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. राणीपूर ते प्रतापपूर शिवारातील  विजय प्रकाश पाटील यांच्या शेतातील गुरांच्या गोठय़ातील दोन वर्षाच्या वासरूला बिबटय़ाने फस्त केल्याची घटना घडली. बिबटय़ाच्या दहशतीमुळे या परिसरातील शेतीकामेही रखडली आहेत.
प्रतापपूर येथील विजय पाटील हे आपल्या  शेतातील गोठय़ात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना गायीने हंबरडा फोडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ गोठय़ाकडे धाव घेतली. या वेळी त्यांच्या दृष्टीस बिबटय़ा दोन वर्षाच्या वासरूला फरफटत नेत असल्याचे दिसून येताच त्यांनी गावाकडे धाव घेतली. या घटनेबाबत त्यांनी राणीपूर गावातील ग्रामस्थांना कळविले असता. ग्रामस्थांनी शेताकडे धावतली. दरम्यान तोर्पयत बिबटय़ाने दोन वर्षाच्या वासरूला फस्त केल्याचे निदर्शनास आले.
घटनेबाबत वनविभागाला तत्काळ माहिती दिल्याने वनक्षेत्रपाल शेंडे,  वनपाल एन.पी. पाटील, वनरक्षक एल.टी. पावरा यांनी घटनेचा पंचनामा केला असता त्यांना ठिकठिकाणी बिबटय़ाच्या पायांचे ठसे आढळून आले. त्यामुळे बिबटय़ाने वासरूला फस्त केल्याची नोंद करण्यात आली. या वेळी वनविभागाच्या कर्मचा:यांनी घटनास्थळी फटाके फोडून मिरची पुडची धुरळी केली. दरम्यान, वनविभागाच्या अधिका:यांनी विजय पाटील यांना           गुरांना गावात घेऊन जाण्याचा सल्ला  दिला.
तळोदा तालुक्यातील मोहिदा, कळमसरे येथे दिवसा बिबटय़ाचा संचार असल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने या परिसरात वनविभागाने गस्त  वाढवून बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

दोन महिन्यांपूर्वी प्रतापपूर परिसरात गुराख्याच्या बक:या व रखवालदाराच्या कुत्र्याला बिबटय़ाने फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात बिबटय़ाचा वावर वाढल्याचे दिसून येत असल्याने वनविभागाने याठिकाणी गस्त वाढवून बिबटय़ाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: In the area of Pratappur, Bibtaya fears kept agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.