बोरचक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेट उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:08 PM2020-01-06T13:08:24+5:302020-01-06T13:08:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : बोरचक येथील टिम ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत नियोजन रेल्वे स्टेशन खांडबारा ...

Area-wide activities of Barkach elementary school students | बोरचक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेट उपक्रम

बोरचक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेट उपक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खांडबारा : बोरचक येथील टिम ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत नियोजन रेल्वे स्टेशन खांडबारा व वाटवी येथील वीज उपकेंद्राला भेट दिली.
विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशन निरीक्षण व रेल्वे आवागमन सिस्टीमची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानक प्रमुख यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी जाणारी महानंदा व विशाखापट्टन्म एक्सप्रेस व मेमो गाडीचे विश्लेषण केले. प्रत्यक्ष सिस्टीम यंत्राची माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यानंतर वाटवी येथे वीज उपकेंद्राचे मोरे यांनी माहित देत विजेपासून व त्याच्या खांबापासून सावध राहण्याचे सांगितले. विजेचे महत्त्व व बचतीचे फायदे यावर मार्गदर्शन केले. दुपारी विद्यार्थ्यांना शाळेत नाताळनिमित्त भोजन देण्यात आले.
यावेळी पास्टर शिरीष, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सत्तेसिंग वळवी उपस्थित होते. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Area-wide activities of Barkach elementary school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.