क्रिकेट खेळण्यावरुन दोन गटात सशस्त्र हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:31 AM2019-03-20T11:31:22+5:302019-03-20T11:31:47+5:30
नंदुरबार : क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी ...
नंदुरबार : क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलीसांनी २०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला असून मंगळवारी दुपारपर्यंत संशयित आरोपींची धरपकड सुरु होती़
शहरातील हमालवाडा व माळीवाडा परिसरातील युवकांमध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यातून वाद झाला होता़ यातून सोमवारी रात्री दोन गटात पुन्हा वाद झाला़ वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले़ यादरम्यान दोन्ही गटांकडून लाठ्या, दांडके, लोखंडी पाईप आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला करण्यात आला़ महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ रात्री १० वाजेपासून सुरु झालेल्या या भांडणात ठिकठिकाणाहून युवकांचे जत्थे लाठ्याकाठ्या घेत हजर झाल्याने परिसरात पळापळ झाली होती़ शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन्ही गटांनी नेहरु चौक परिसरात येत पोलीसांवर दगडफेक सुरु केली़ यात परिसरातील दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस अधिक्षक संजय पाटील व अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात तातडीने दंगा नियंत्रण पथक आणि राखीव कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याने जमावावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते़
याप्रकरणी मंगळवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक महेश कैलास क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत जाधव, गणेश सूळ, बिरजू म्हस्के, विशाल लकडे, आकाश केदारे, योगेश शिंदे, गिरीश मराठे, सचिन जाधव, पप्पू गिरासे, शिवा येडगे, राजेश मराठे, चेतन सूळ, गजेंद्र सूळ, आकाश पाटील, सतीष राजपूत, शुभम डबडे, रविंद्र म्हस्के, गणेश पवार, रोहित हटकर, राहुल लिगडे, शुभम कोळी, राहुल गाडगे, गौरव केदार, सचिन मोरे, निलेश भडकर, भूषण भडकर, विक्की तांबे, सुरेश भगवान गौड, संजय दगडू पवार, भानुदास रमेश सूळ, चौरेनाथ उत्तम ठाकरे, सुधीर बाबुराव गोडसे, अक्षय जयसिंग भोसले, भटू रंगनाथ बंडगर, दिनेश बाबुलाल सोनवणे, मुकेश राजू पाटील, राकेश जाधव, सागर महेंद्र पाटील, कैलास रमेश मिस्तरी, गणेश दगा माळी, ज्ञानेश्वर विठ्ठल माळी, सूरज अशोक माळी, संतोष हिरालाल माळी, देवा भिका माळी, महेंद्र बुधा माळी, गोपाल रामचंद्र माळी, सूरज अशोक माळी, ईश्वर साहेबराव माळी, धनराज राजू माळी, धनराज गणेश माळी, सोनू हिरालाल माळी, संभाजी अप्पा माळी, सचिन शिवदास जाधव, सूर्यकांत खंडू माळी, प्रकाश विठ्ठल माळी, अक्षय सदाशिव माळी, लकी माळी, मनोज कैलास माळी, पंकज रामू माळी, विक्की सुका माळी, प्रतिक सदाशिव माळी, जयेश बाबुराव माळी, दादा राजेंद्र माळी, तासू भैय्या, गोपाल रमेश माळी, रुपेश संजय माळी, दिनेश शिरसाठ सर्व रा़ नंदुरबार यांच्यासह १०० ते २०० जणांच्या अनोळखी जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़