अक्कलकुव्यातील व्यापा-यांना अटक : जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:49 PM2018-02-17T12:49:36+5:302018-02-17T12:49:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथे जातीवाचक शिविगाळ करणा:या दोघा व्यापा:यांना न्यायालयाच्या आदेशानंतर अटक करण्याचे आदेश देण्यात आले होत़े त्यानुसार त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़े उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आह़े
अक्कलकुवा येथील व्यापारी तालुक्यातील आदिवासी शेतक:यांची फसवणूक करत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करावी, या मागणीसाठी भिलीस्थान टायगर सेनेकडून पाठपुरावा सुरू होता़ यादरम्यान 30 ऑक्टोबर 2017 रोजी अक्कलकुवा येथील खाजगी व्यापा:यांकडे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी गेले असता त्याठिकाणी त्या शेतक:यांना सोयाबीनचा हमीभाव न मिळाल्याने जिल्हाधिकारी, तहसिलदार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना कळविण्यात आले होते. यावेळी व्यापा:यांनी भिलीस्थान टायगर सेनेचे निलेश पाडवी व समिर पाडवी यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्याविरोधात अक्कलकुवा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर भिलीस्थान टायगरसेनेतर्फे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती़ सात फेब्रुवारी रोजी खंडपिठाने दिलेल्या निकालानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत मंगळवारी रात्री प्रतिष्ठीत व्यापारी रमेश भवरलाल जैन व पुनमचंद भवरलाल जैन यांना अटक करण्यात आली आह़े