रणरणत्या उन्हात ‘आशां’चे आंदोलन

By admin | Published: April 10, 2017 11:39 PM2017-04-10T23:39:34+5:302017-04-10T23:39:34+5:30

जिल्हाभरातून उपस्थिती : सीईओंना दिले मागण्यांचे निवेदन

Asha's movement in the changing sun | रणरणत्या उन्हात ‘आशां’चे आंदोलन

रणरणत्या उन्हात ‘आशां’चे आंदोलन

Next

नंदुरबार : आशा कर्मचा:यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.
जिल्हाभरातील आशा व आशा गटप्रवर्तक कर्मचारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर एकवटल्या होत्या. आयटकच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हातही आंदोलकांचा उत्साह व  जोश कायम होता. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आशा कर्मचा:यांना नियमित कर्मचा:यांचे सर्व लाभ मिळावे, 15 हजार रुपये दरमहा वेतन मिळावे, आरोग्य खात्यातील रिक्त पदांवर आशा कर्मचा:यांची नेमणूक करावी, ग्रामपंचायत, पंचायत            समिती निवडणुकीत निवडून           आलेल्या आशा कर्मचा:यांचे मानधन जिल्हा प्रशासनाने रोखून धरले आहे. त्यांना राजीनामा देण्यास भाग            पाडले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात केस सुरू आहे. त्यामुळे तातडीने मानधन  देण्यात यावे. कर्मचा:यांना मेडिकल किट्स देऊन त्यांची पुनर्भरणी            करावी व आवश्यक कागदपत्रे देण्याची तरतूद करावी. जननी सुरक्षा योजनेतील आशांसाठी वाहतूक व इतर खर्च वेगळा मिळून गरोदर मातेसाठीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी. एपीएल व बीपीएल असा भेदभाव न करता प्रसूती होणा:या लाभार्थी महिलेस व आशा कर्मचा:यास जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा आदींसह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे.
या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, राज्य सदस्या वैशाली खंदारे, राष्ट्रीय सदस्या ममता वसावे, जिल्हाध्यक्षा ललिता माळी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो आशा कर्मचारी उपस्थित होत्या.

Web Title: Asha's movement in the changing sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.