१५ दिवसात महामार्गाच्या दुरुस्तीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:14 PM2020-01-25T13:14:34+5:302020-01-25T13:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नेत्रांग ते शेवाळी या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने १५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नेत्रांग ते शेवाळी या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने १५ ते २० दिवसात कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने सोमावल ता़ तळोदा येथे २७ रोजी होणारा रस्तारोको स्थगित करण्यात आले आहे़ आमदार राजेश पाडवी व विभागाचे अभियंता कांकरिया यांच्या उपस्थितीत तळोदा पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़
शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते खापर दरम्याप पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने त्यांच्याकडून २७ रोजी सोमावल येथे नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ मार्गावर आतापर्यंत तीन ते चार जणांनी प्राण गमावले असून माजीमंत्री पद्माकर वळवी यांचे बंधू सुधाकर वळवी यांचाही खड्ड्यामुळे अपघात होऊन त्यांना दुखापत झाली होती़ यातून संतप्त नागरिकांनी संबधित विभागासोबत संपर्क करुनही दाद दिली जात नसल्याचे चित्र होते़ या प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेत आमदार राजेंद्र पाडवी यांनी रस्ते विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती़ यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली़ आमदार पाडवी व अभियंता कांकरीया यांच्या चर्चा झाल्यानंतर १५ दिवसात दुरुस्तीबाबत आश्वासन देण्यात आले़ आश्वानंतर सोमावल येथे होणारे आंदोजन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले़ यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, विरसिंग पाडवी, किरण सूर्यवंशी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, गोपी पावरा, प्रकाश वळवी आदी उपस्थित होते.
आमदार राजेश पाडवी यांनी महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे महामार्ग दुरुस्ती बाबत संवाद साधला होता़ परंतू त्यावर संबधितांनी कारवाई न केल्याने आंदोलन पुकारण्यात आले होते़