एटीएम ‘पीन’ चोरी करुन शिक्षकाची लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:00 PM2019-06-29T13:00:34+5:302019-06-29T13:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एटीएममधून पैसे काढून देण्याचा चांगुलपणा दाखवत दोघांनी एटीएम पीन जाणून शिक्षकाच्या खात्यातून 1 लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एटीएममधून पैसे काढून देण्याचा चांगुलपणा दाखवत दोघांनी एटीएम पीन जाणून शिक्षकाच्या खात्यातून 1 लाख रुपये परस्पर लंपास केल़े ही घटना 25 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा शहरात घडली़
वालंबा ता़ अक्कलकुवा येथील गेमसिंग दमल्या वसावे हे 25 रोजी सकाळी अक्कलकुवा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना तांत्रिक अडचण आली़ यावेळी तेथे उपस्थित दोघांनी पैसे काढून देतो असे सांगून गेमसिंग वसावे यांच्या हातातून एटीएम घेत पीन नंबर मागितला़ यानंतर त्यांनी पैसे काढून देत वसावे यांना दिल़े परंतू कालांतराने वसावे यांच्या खात्यातून 1 लाख 3 हजार 836 रुपये काढले गेल्याचे लक्षात आल़े फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दोघा ‘ठगां’विरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला़ दोघांनी वसावे यांच्या कडून एटीएम कार्ड घेत त्याचे क्लोनिंग करुन घेत ही फसवणूक केल्याचे समोर आले आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक एस़ज़ेपवार करत आहेत़