एटीएममध्ये खडखडाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:22 PM2017-10-23T14:22:24+5:302017-10-23T14:22:24+5:30
बँकांकडून पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्षच : बाहेरगावी जाणा:यांचे दिवसभर झाले हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या चार दिवसांपासून शहरातील एटीएममधून अविरत कॅश काढणे सुरू असल्याने रविवारी सर्वच एटीएम रिते झाले होत़े बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांसह गावी जाणा:या तसेच बाजारात आलेल्यांना याचा चांगलाच फटका बसला़ शनिवारी बँका सुरू असल्या तरीही पैसे भरणा करणा:या कंपनीचे कर्मचारी सुटीवर असल्याने ही स्थिती निर्माण झाली होती़
नंदुरबार शहरात 12 राष्ट्रीयकृत, चार सहकारी आणि सहा खाजगी बँकांची एकूण 22 एटीएम आहेत़ यापैकी स्टेट बँकेचे एटीएम वगळता सकाळी एकाही ठिकाणाहून नागरिकांना पैेसे काढता येत नसल्याचे सांगण्यात येत होत़े शनिवारी बँका सुरू असतानाच बहुतांश नागरिकांनी एटीएममधून पैसे काढल्याने ही स्थिती निर्माण झाली होती़ साधारण बँकेच्या दर्जानुसार 2 ते 15 लाख रूपयांचा भरणा शहरातील विविध एटीएममध्ये केला जातो़ गेल्या चार दिवसात शनिवारी मोजक्याच ठिकाणी पैसे टाकले गेल्याने नागरिकांचा रविवार सुनाच गेला होता़ विशेष म्हणजे खरेदीसाठी शहादा आणि तळोदा शहरातील नागरिकांचा ओघ नंदुरबार येथे कायम आह़े त्यांना खडखडाटाचा सर्वाधिक फटका बसला होता़ सोमवारी बँका उघडल्यानंतर पुन्हा पैसे भरल्यानंतर निर्माण झालेली कोंडी फुटणार आह़े