पोलिसांवरील हल्ले सामाजिक चिंतेचा विषय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:48 PM2018-03-09T12:48:48+5:302018-03-09T12:48:48+5:30

The attacks on the police are a matter of social concern! | पोलिसांवरील हल्ले सामाजिक चिंतेचा विषय!

पोलिसांवरील हल्ले सामाजिक चिंतेचा विषय!

Next

 मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा किंवा धक्काबुकीच्या तीन घटना घडल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हवाच. त्यासाठी पोलिसांकडून कायद्याचा देखील धाक दाखविला जातोच. परंतु सध्या गुन्हेगारांचा पुळका असणा:या विविध संघटना, त्यांचे गल्लीबोळातील कार्यकर्ते लक्षात घेता पोलिसांकडून कुणाला मारहाण झाली, धाक दाखविला गेला तरी त्याचा जाब विचारणारे कमी नाहीत. मानव अधिकाराचा भंग झाल्याची ओरड केली जाते. न्यायालात देखील अशा बाबी आणल्या जातात.  काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील त्यात मागे नसतात. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी आपला धाक दाखविण्याचा प्रय} केला तर लागलीच खिशातील मोबाईल काढून त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून ती सोशल मिडियावर व्हायरल केली जाते. पोलिसांनी कशी दबंगगिरी केली, सर्व सामान्यांप्रती पोलिसांचा व्यवहार कसा याबाबत सोशलमिडियातील तज्ज्ञांना पुळका येतो. ही बाब लक्षात घेता आता पोलिसांनीही नरमाईचे धोरण स्विकारल्याचेच दिसून येते. परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीकडून पोलिसांवर हात उचलण्याचे, त्यांना धक्काबुकी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. 
नंदुरबार शहर व जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील घटना लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. शहरातील एका गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलीस महिला कर्मचा:याला एका युवकाकडून शिविगाळ व धक्काबुकी झाली होती. त्याची रितसर फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानंतर वादग्रस्त पोस्टर्स प्रकरण घडले. त्यानंतर मोलगी येथे कॉपी पुरविणा:यांकडून पोलिसाला मारहाण झाली. बुधवारी विसरवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचा:यांना जमावाकडून मारहाण झाली. त्यात तिघे पोलीस जखमी झाले. शिवाय पोलीस निरिक्षकांनाही धक्काबुकी करण्यात आली. या सर्व घटनांची फिर्याद दाखल झालेली आहेच. गुन्हेगारांना शिक्षाही होईलच. परंतु यामुळे पोलिस कर्मचा:यांचे मनोबल कमी होत आहे त्याकडे कोण पहाणार हे देखील लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. 
एकीकडे पोलीस अधीक्षक संजय पाटील हे पोलीस दलात विविध उपक्रम राबवून पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय} करीत आहेत. चांगले काम करणा:यांना लागलीच गौरविण्यात येत आहे. कर्मचा:यांसह त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य, खेळ, प्रशिक्षणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस दलात हे सर्व चांगले उपक्रम सुरू असतांना बाहेर मात्र, जनतेकडून पोलिसांना अपमानाची वागणूक सहन करावी लागत आहे. गुन्हेगारांवरील वचक निर्माण करून गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना आता आपला दंडुका बाहेर काढण्याची वेळ आली आहे. उठसूठ कुणीही यावे आणि पोलिसांवर हात उगारावा, त्यांना धक्काबुकी करावी ही बाब पोलिस दलाच्या दृष्टीने देखील नामुष्कीची ठरत आहे.

Web Title: The attacks on the police are a matter of social concern!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.