अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा
By मनोज शेलार | Published: September 24, 2023 07:16 PM2023-09-24T19:16:32+5:302023-09-24T19:16:53+5:30
नंदुरबार : अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी ...
नंदुरबार : अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. यासंदर्भात शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सोरापाडा (ता. अक्कलकुवा) येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह खापर (ता. अक्कलकुवा) येथील युवकाशी लावण्यात येणार होता. याबाबत माहिती सोरापाडा येथील एकाला मिळाल्यावर त्यांनी हा बालविवाह रोखला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत ही माहिती दिली. याबाबत राजू गमेरसिंग पाडवी (४८) यांनी फिर्याद दिल्याने खापर येथील दोन, सोरापाडा येथील दोन तर कोराई येथील एक अशा पाच जणांविरुद्ध बालविवाह अधिनियमान्वये अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय जाधव करीत आहेत.