नंदुरबारात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:42 PM2019-12-01T12:42:47+5:302019-12-01T12:42:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील भर वस्तीतील मुख् रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रय} केल्याची घटना 29 रोजी पहाटे घडली. ...

Attempts to break ATMs in Nandurbar | नंदुरबारात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

नंदुरबारात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील भर वस्तीतील मुख् रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रय} केल्याची घटना 29 रोजी पहाटे घडली. सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर चोरीचा उद्देश उघड झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भर वस्ती आणि रस्त्यावरील एटीएम फोडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 
नंदुरबारातील जळगाव पिपल्स को ऑपरेटीव्ह बँकेच्या एटीएम मध्ये 29 रोजी पहाटे चोरटय़ाने प्रवेश करून एटीएम फोडण्याचा प्रय} केला. एटीएम मशिनच्या मागील मुख्य दरवाजा उघडल्यानंतर दुसरा ऑटोमेटीक दरवाजा लॉक असल्याने तो उघडू शकला नाही. त्यामुळे त्याने पीनकोडसोबत छेडखानी केली. 
परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे मशिन फोडण्याचा प्रय} केला. परंतु तरीही उपयोग झाला नाही. अखेर अपयश येत असल्याचे लक्षात आल्यावर चोरटा तेथून निघून गेला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाला आहे. 
सकाळी एक ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला मशीन लॉक असल्याचे व अस्ताव्यस्त सामान दिसल्याने त्याने बँक अधिका:याशी संपर्क साधला. बँक अधिका:यांनी सीसीटीव्ही फुटेजे चेक केले असता त्यात हा प्रकार उघडकीस आला. 
पोलिसांना कळविल्यानंतर अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी भेट देवून पहाणी केली. बँक अधिकारी सुपडू भुस:या गावीत यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Attempts to break ATMs in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.