नंदुरबार येथे महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:33 AM2018-03-29T11:33:53+5:302018-03-29T11:33:53+5:30

डिगंबर जैन धर्मियांकडून शितपेयांचे वाटप

Attractive attention by the grand procession going to Mahavir Jayanti at Nandurbar | नंदुरबार येथे महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

नंदुरबार येथे महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथे गुरुवारी महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होत़े  सकाळी नऊ वाजता शहरातील गणपती मंदिराजवळील जैन मंदिरापासून तुप बाजार, छत्रपती शिवाजी रोड, जळका बाजार,  सोनार खुंट ते नेहरु चौक दरम्यान भव्य मिरवणुक काढण्यात आली़ यात मोठय़ा संख्येने समाज बांधव उपस्थित होत़े
भगवान महावीर की जय़़ वीरा वीरा जय महावीरा़़ जय जिनेंद्ऱ़ अमर रहे अमर रहे भगवान महावीर अमर रहे. अशा विविध घोषणांनी परिसर दणाणला होता़ महावीर जयंतीनिमित्त सकाळीच डिगंबर जैन समाज बांधवांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होत़े शोभायात्रेत महावीर भगवान यांच्या प्रतिमेला फुलांनी सजविलेल्या वाहनावर ठेवून मिरवणुक काढण्यात आली होती़ या वेळी ठिकठिकाणी जैन समाज बांधवांकडून प्रतिमा पूजन करण्यात येत होत़े जैन धर्मिय ध्वज चौका चौकात लावण्यात आले होत़े दरम्यान, नंदुरबार येथील गणपती मंदिराजवळ डिगंबर जैन धर्मियांकडून शितपेयांचे वाटप करण्यात आले होत़े यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े 

Web Title: Attractive attention by the grand procession going to Mahavir Jayanti at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.