जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:47 PM2019-02-09T12:47:55+5:302019-02-09T12:48:03+5:30

गंभीर : 31 डिसेंबर्पयत होती मुदत, केंद्रचालक व ग्रामसेवकांची चालढकल

Avoid submitting the development plan of 72 villages in the district | जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण 595 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींकडून अद्याप ऑनलाईन पध्दतीने विकास आराखडा सादर करण्यात आलेले नाहीत़ संबंधित आराखडा सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2018 र्पयत अंतीम मुदत देण्यात आली होती़ संबंधित ग्रामपंचायतींनी लवकर आराखडा सादर करावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ 
केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणा:या विविध निधींचे कशा प्रकारे विनियोग केला जाईल, कुठल्या कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल आदी विविध बाबींचा अहवाल ऑनलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी व नंतर जिल्हा परिषदेला सादर करावयाचे होत़े ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वितरीत करण्यात येत असतो़ या निधीच्या खर्चाचेही तपशील ग्रामपंचातींनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ परंतु या आदेशाकडे जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींकडून सफशेल दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे यातून दिसून येत आह़े ग्रामपंचायतींना हा अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देऊनही जवळपास सव्वा महिना झाल्यावरही हा अहवाल सादर करण्यात आला नाही़ 
अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक ग्रा़पं़चा समावेश
दरम्यान, जिल्ह्यातील या 72 ग्रामपंचातींमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक 48 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े त्यानंतर धडगाव 20, शहादा 1 तर नवापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानुसार बहुतेक ग्रामपंचातींना अहवाल सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आल़े संकेतस्थळावर लॉगिन न होणे, पासवर्ड चुकीचा असणे आदी अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागत असल्याचे सांगण्यात आल़े प्रशासकीय आकडेवारीनुसार आतार्पयत 523 ग्रामपंचायतींनी आपले विकास आराखडे सादर केले असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले आह़े 
ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये पारदर्शका निर्माण व्हावी, तसेच गावात कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार याची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामविकास आराखडय़ाचे सादरीकरण करणे आवश्यक आह़े परंतु तरीदेखील बहुतेक ग्रामपंचायतींकडून विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आह़े  
ग्रामविकास आराखडा ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रचालक व ग्रामसेवकांची आह़े परंतु त्यांच्याकडून अहवाल सादर करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांना पाठीशी न घालता लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आह़े आराखडय़ांतर्गत, अंगणवाडी, आरोग्य, पाणी मुलभूत विषयांवर काम होणे गरजेचे असत़े
 

Web Title: Avoid submitting the development plan of 72 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.