खापर ग्रामस्थांचे पाण्यासाठी ग्रामस्थांचे रात्रभर जागरण
By admin | Published: May 27, 2017 03:31 PM2017-05-27T15:31:44+5:302017-05-27T15:31:44+5:30
पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने भिषण पाणीटंचाई
Next
>ऑनलाईन लोकमत
खापर, जि.नंदुरबार, दि.27 - अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थ गेल्या महिन्याभरापासून पाण्यासाठी दररोज रात्री जागरण करीत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणा:या स्त्रोतांमधील पाणी कमी झाल्याने गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी येथील पंचायत समिती सदस्या कविता कामे यांनी अक्कलकुवा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खापर गावात नळपाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, भर उन्हात पाण्यासाठी नागरिकांना व विशेष करून महिलांना पायपीट करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला असून, याकडे प्रशासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देवून दखल घ्यावी व खापर गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर त्वरित उपाययोजना करावी केली आहे. या निवेदनावर भाजपा जिल्हा चिटणीस विनोद कामे, गणेश प्रजापती, रोहिदास लोहार, सुनील सूर्यवंशी, युवराज मराठे, सुनील सोनवणे, रवींद्र पाडवी, अजय पटेल, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.