रोटरी ऑफ नंदनगरीतर्फे रॅलीद्वारे कोरोना लसीबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:55 PM2021-01-28T12:55:37+5:302021-01-28T12:55:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज व वजीही स्काऊट ग्रुपतर्फे कोरोना व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज व वजीही स्काऊट ग्रुपतर्फे कोरोना व कोरोना लसीबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोनाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज वजीही स्काऊट ग्रुपसोबतच स्मित हॉस्पिटल, लायन्स फेमिना क्लब व लायनेस क्लब, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नंदनगरी, न्यू इंग्लिश स्कूल, उमर्दे खुर्दे यांनी सहभाग घेतला होता. कोरोना व कोरोना लसीबाबत जनजागृतीच्या रॅलीला प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
रॅलीचा शुभारंभ दीनदयाल चौक येथून झाला. तेथून हुतात्मा चौक, अहिल्याबाई विहीर, महात्मा गांधी पुतळा, पंडित जवाहरलाल नेहरू पुतळामार्गे तालुका क्रीडा मैदान येथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. खासदार डॉ. हिना गावित याही या रॅलीला सदिच्छा भेट देत सहभागी झाल्या. कोरोना जनजागृती रॅलीत बोहरी समाजाच्या वजीही स्काऊट ग्रुपचे बँड पथक हे मुख्य आकर्षण होते. या बँड पथकाने नंदुरबारकरांचे लक्ष वेधून घेतले. या वजीही स्काऊट बँड पथकाचे नेतृत्व रोटेरियन फकरुद्दीन जलगुणवाला यांनी केले होते.
या रॅलीदरम्यान कोरोना व कोरोना लसीबाबत विविध जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. या रॅलीत न्यू इंग्लिश स्कूल, उमर्दे खुर्दे येथील विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. रॅलीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, प्रीतिष बांगड, जितेंद्र सोनार, बोहरी समाजाचे प्रमुख अदनान सफदारी, ॲड. सलीम वोरा, अय्याझ वोरा, फिरदोस लोखंडवाला, लायनेसच्या प्रांतपाल डॉ. तेजल चौधरी, तसनीम जलगुणवाला, लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा डॉ. गायत्री पाटील, सचिव मीनल म्हसावदकर, दीपा वाडेकर, कांचन मुलानी, शीतल चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे फकरुद्दीन जलगुणवाला, आकाश बेदमुथा, दिनेश साळुंखे, इसरार सय्यद, किरण दाभाडे, प्रवीण येवले, फय्याझ खान, इक्बाल शेख, विनोद जैन, अब्बास काटावाला, जुझेर बोहरी, मुर्तुझा वोरा, रोट्रॅक्ट क्लब नंदनगरीचे इंद्रिस वोरा आदी उपस्थित होते.
रॅलीदरम्यान शहरातील हुतात्मा स्मारक येथे बालशहीद, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मारकांना अभिवादन करण्यात आले, तसेच कोरोनाबाबत राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले होते.