एकाधिकार खरेदी केंद्रांकडे पाठ : अवघी दिडशे क्विंटल तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:13 PM2018-02-13T17:13:17+5:302018-02-13T17:13:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव मिळत असल्याने शेतक:यांचा त्याकडे कल आहे.
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे एकाधिकार तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही केंद्रांना प्रत्येकी तीन तालुके जोडण्यात आली आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रांना शेतक:यांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तीन तालुके मिळून एकच खरेदी केंद्र असल्यामुळे शिवाय ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्यामुळे प्रतिसाद कमी असल्याचेही दिसून येत आहे.
यंदा 16 हजार हेक्टर
तुरीचे क्षेत्र यंदा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढले होते. सरासरी क्षेत्र 15 हजार हेक्टर्पयत आहे. परंतु दरवर्षी 12 ते 14 हजार हेक्टर्पयत क्षेत्र असते. यंदा ते 16 हजार 400 हेक्टर्पयत गेले होते. एकटय़ा नवापूर तालुक्यात तब्बल आठ हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. गेल्या तीन ते चार वर्षापासून तुरीला मोठय़ा प्रमाणावर भाव मिळत असल्यामुळे यंदा क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात आले. यंदा पजर्न्यमान चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले मिळाले. परंतु भाव कमी मिळाल्याने शेतक:यांमध्ये काही प्रमाणात नाराजीही राहिली.
एकाधिकार खरेदी केंद्र
तुर खरेदीसाठी एकाधिकारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर नाफेडअंतर्गत तुरीची खरेदी करण्यासाठी शेतकरी संघामार्फत एकाधिकार खरेदी केंद्र नंदुरबारात सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. खरेदी केंद्रामुळे शेतक:यांना ते सोयीचे होईल अशी अपेक्षा होती. परंतु ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे शेतक:यांनी या झंझाटातून बाहेर राहणेच पसंत केले. खरेदी केंद्रात तूर आणतांना मालाची आद्रता 12 टक्के एवढी पाहिजे. तूर विक्रीसाठी आणतांना सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकचे पासबूक आदी कागदपत्रे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीसाठी आणणे शेतक:यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
वाहतूक खर्च परवडेनासा
एका खरेदी केंद्राला तीन तालुके जोडण्यात आल्यामुळे एवढय़ा लांबून तूर विक्रीसाठी आणण्याचा खर्चच शेतक:यांना न परवडणारा आहे. अक्कलकुवा ते नंदुरबार किंवा नवापूर ते नंदुरबार इतक्या अंतराचा मालवाहतुकीचा खर्च परवडणे शेतक:यांना शक्य नाही. शिवाय भाव देखील कमी मिळत असल्यामुळे शेतक:यांचा कल सध्यातरी खरेदी केंद्रांकडे नसल्याचे चित्र आहे.