संपाच्या पाश्र्वभूमीवर नंदुरबारातील सर्व एटीएममध्ये कॅश भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:56 PM2018-05-30T12:56:16+5:302018-05-30T12:56:16+5:30
उपाययोजना : जिल्ह्यातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या 63 शाखांमधील कर्मचारी दोन दिवसीय संपात सहभागी होणार आहेत़ संपाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा अग्रणी बँकेकडून सर्व शाखांच्या एटीएममध्ये कॅशचा भरणा करण्यात आला आह़े जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांचे 63 एटीएम सध्या सुरू आहेत़
इंडियन बँक्स असोसिएशन या संस्थेकडून देशातील बँकांच्या कर्मचा:याच्या वेतनश्रेणीत 2 टक्क्याने वाढ करणे प्रस्तावित होत़े या प्रस्तावाचा अधिकारी व कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवत संपाची घोषणा केली आह़े यानुसार 30 आणि 31 मे रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन या प्रमुख संघटनेकडून संपाचे संचलन करण्यात येणार आह़े दोन दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी नंदुरबारसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बँकांमध्ये गर्दी दिसून आली़ नागरिकांनी मोठय़ा रकमा काढण्यासह भरणा करण्याचे व्यवहार पूर्ण केले होत़े सायंकाळी साडेपाच वाजेर्पयत सर्वच ठिकाणी गर्दी कायम असल्याने वेळ संपूनही बँकांच्या प्रशासनाने कामे पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली आह़े या संपात केवळ राष्ट्रीयकृत बँकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील इतर खाजगी आणि सहकारी बँक या संपाबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आह़े
खाजगी बँकांचा संपात समावेश नसला तरी दैनंदिन कॅश पुरवठा स्टेट बँकेतून करण्यात येतो़ त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यात भारतीय स्टेट बँकेच्या 12, देना बँकेच्या तीन, बँक ऑफ बडोदाच्या सहा, बँक ऑफ इंडियाच्या दोन, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कॅनरा बँक यासह विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या 63 शाखा आहेत़ या शाखांनी लावलेल्या एटीएममध्ये दोन दिवसात 40 कोटी रूपयांर्पयतचा भरणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े एटीएममध्ये कॅश भरणा करून ग्राहकांची गैरसोय होऊ देणार नसल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारोट यांनी दिली आह़े
कॅश संपल्यानंतर पुन्हा भरणा करण्याची तयारी लीड बँकेकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े