परतीच्या पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:16 PM2017-10-09T12:16:58+5:302017-10-09T12:17:15+5:30
शहादा, नंदुरबार, नवापूरात जोर : पपई, केळी, सोयाबीनसह भातचे नुकसान, घराचे पत्रे उडाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परतीच्या पावसाने शनिवारी रात्री शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागाला झोपडून काढले. वादळवा:यासह झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पपई व केळी पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय काढणीवर आलेला मका, सोयाबीन पिकालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात 12 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात घटस्थापनेच्या आदल्या दिवशी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती. ऋुतूमानानुसार सप्टेंबर्पयतच पावसाळा असल्यामुळे अधिकृतरित्या पावसाळा संपल्याची नोंद असली तरी परतीचा पाऊस बाकी होता.
ढगांच्या गडगडाटासह पाऊस
शनिवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान ढगांच्या गडगडाट व विजांच्या चमचमाटासह पावसाला सुरुवात झाली. शहादा तालुक्याचा काही भाग आणि नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर ब:यापैकी होता.
पपई, केळीचे नुकसान
सोसाटय़ाचा वारा आणि पावसाचा जोर यामुळे पपई, केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. बोराळे शिवारातील अनेक शेतक:यांच्या पपईचे झाड अध्र्यातून तुटून पडले होते. या परिसरातील सात ते आठ शेतक:यांच्या पपईचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय प्रकाशा शिवारातील केळीचे देखील नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
म्हसावद परिसरात अनिल मुरार पाटील यांच्या म्हसावद शिवारातील शेतातील केळीचे नुकसान झाले. त्यांची 1200 झाडे केळीच्या घडासह कोलमडून पडले. दीपक पाटील यांच्या पपईची 125 झाडे अपरिपक्व पपईसह कोलमडून पडली. म्हसावद-पिंप्री रस्त्यावर विजेचे खांब व तारा तुटून पडल्या. रायखेड शिवारातील आनंद पाटील यांच्या शेतात केळीची झाडे पुर्णपणे कोसळल्याने सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. परिपक्वझालेले सोयाबीन, मका या पिकांनाही फटका बसला आहे. कापसाचेही देखील मोठे नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात भात आणि उडीद पिकालाही फटका बसला आहे.
घराची पत्रे उडाली
खेतिया परिसरात वादळी वा:यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. पिकांचेही नुकसान झाले. आमदार दिवाणसिंग पटेल, वी.पी.सिंह सोलंकी, मुरली साटोटे, प्रेमसिंह जाधव,नितीन निझरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.