13 हजार शेतक:यांना बोंडअळीची भरपाई : नंदुरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:42 PM2018-06-20T12:42:59+5:302018-06-20T12:42:59+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील 85 हजार बोंडअळीग्रस्त शेतक:यांना 89 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज शासनाने जाहीर केले होत़े मे महिन्यात प्राप्त झालेल्या निधीपैकी आजवर केवळ 17 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असून महसूल विभागाला मिळालेल्या याद्यांनुसार हे वाटप सुरू आह़े 13 हजार शेतक:यांच्या खात्यांवर ही रक्कम पडली असली तरी अद्यापही 72 हजार शेतक:यांना मदतीची प्रतीक्षा आह़े गेल्या हंगामात बोंडअळीमुळे जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 1 लाख 18 हजार हेक्टर पैकी 95 हजार हेक्टर कापूस खराब झाला होता़ याबाबतचा पंचनामा कृषी विभागाने 31 जानेवारीअखेर करून शासनाकडे दिला होता़ यानुसार शेतक:यांना कोरडवाहू हेक्टरी 6 हजार 800 तर बागायत क्षेत्रातील नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती़ मदतीची ही रक्कम मे महिन्यात महसूल विभागाला प्राप्त झाली होती़ विभागाने याद्या तपासून रक्कम शेतक:यांच्या बँक खात्यात मदत जमा केली आह़े शासनाने बोंडअळीग्रस्त शेतक:यांसाठी 89 कोटी 65 लाख 22 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती़ जिल्ह्यातील 85 हजार 895 शेतकरी शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार पात्र ठरल्याने त्यांना मदत देण्यात येत आह़े तालुकास्तरावरून देण्यात येत असलेल्या मदतीत आधी कोरडवाहू क्षेत्रातील शेतक:यांना प्राधान्य देण्याची गरज असताना बागायती शेतक:यांना मदत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात बाधित असलेल्या 95 हजार 802 हेक्टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याचे अहवालात म्हटले आह़े शहादा तालुक्यातील शेतक:यांना तहसीलदार कार्यालयामार्फत आठ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत़ नंदुरबार तालुक्यानंतर सर्वाधिक सात हजार शेतक:यांचा समावेश या तालुक्यात आह़े परंतु महसुली मंडळांकडून याद्या देण्यास विलंब होत असल्याने त्यानुसार बिल काढून धनादेश बँकेत जमा करण्याच्या कामांना खीळ बसल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यात अद्यापही चार हजारपेक्षा अधिक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़ या रकमेचे विभागाने तत्काळ वाटप सुरू केले असले तरी काही तालुक्यात शेतक:यांच्या याद्या प्रलंबित असल्याने वाटप कामकाजावर परिणाम झाला आह़े याबाबत जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी तहसीलदारांना सूचना करून मदतनिधी वाटपास वेग देण्याच्या सूचना केल्या आहेत़ बँकांकडून शेतक:यांच्या खात्यांवर मदतनिधी वर्ग करण्यात दिरंगाई होत असल्याच्या माहितीनंतर जिल्हाधिका:यांनी बँकांच्या अधिका:यांची बैठक घेत सूचना केल्या होत्या़ मदत वाटपात महसूल विभागातून अक्कलकुवा तालुक्याने ब:यापैकी कामगिरी केल्याचे दिसून आले आह़े या तालुक्यातील पाच शेतक:यांपैकी 907 शेतक:यांना 37 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आह़े अक्कलकुवा तहसील कार्यालयाकडे 37 लाख रुपयेच वर्ग करण्यात आले होत़े
ही सर्व रक्कम तहसीलदारांनी मोरंबा या एकाच मंडळात वाटप करून शेतक:यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आह़े तालुक्यात चार शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले आह़े महसूल विभागाच्या याद्यांनुसार बँकेत आणि मग शेतक:यांच्या खात्यावर जमा होणा:या रकमेला बराच विलंब लागत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ खरीप हंगामाच्या तयारीत ही रक्कम कामी येईल या आशेने बँकांमध्ये चौकशी करण्यासाठी शेतकरी चकरा मारत आहेत़ ब:याच ठिकाणी तलाठय़ांकडून त्या-त्या गावातील शेतक:यांच्या खात्यांची माहिती संकलनाचे काम अद्यापही सुरू असल्याने निधीला ब्रेक लागला आह़े विशेष म्हणजे नंदुरबार, नवापूर, शहादा या तालुक्यांतील दुस:या टप्प्याचे वाटप लवकरच सुरू होणार आह़े