पिकांच्या नुकसानीमुळे बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:26 AM2021-01-09T04:26:32+5:302021-01-09T04:26:32+5:30
तालुक्यात या पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे तालुक्यातील बोरचक गावातील रोहिदास रामदास गावित यांचा गहू जमीनदोस्त झाला आहे. रोहिदास ...
तालुक्यात या पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे तालुक्यातील बोरचक गावातील रोहिदास रामदास गावित यांचा गहू जमीनदोस्त झाला आहे. रोहिदास यांनी शासनाकडे नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतात ठेवलेला कोरडा चारा ओला झाल्याने गुराढोरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंतित असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील चिंचपाडापासून तर बीजादेवी फाट्यापर्यंत गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ११ वाजेच्या सुमारास वडदा ते मोठी कडवानपर्यंत जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वाहनचालकांना वाहन मार्गस्थ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अवकाळीमुळे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.