शहादा तालुक्यात केळीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:04 PM2018-06-07T13:04:25+5:302018-06-07T13:04:25+5:30
शहादा : शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह परिसरात वादळी वा:यासह जोरदार पावसामुळे ब्राम्हणपुरी, गोगापूर, कुरंगी, रायखेड शिवारात केळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.
शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह आजूबाजूच्या गावांमध्ये मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर चालेल्या वादळी वा:यासह झालेल्या पावसामुळे शेतक:यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
ब्राम्हणपुरी, रायखेड, सुलतानपूर, गोगापूर, कुरंगी, भागापूर, जवखेडा आदी गावासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी परिसरात दुपारनंतर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. अचानक रात्री साडेअकराच्या सुमारास वादळी वा:याला सुरुवात झाली यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर सुरु असलेल्या पावसामुळे शेतक:यांच्या केळी पिकाचे नुकसान झाले. अगोदरच केळी पिकाला भाव नाही आणि त्यात आलेल्या अस्मानी संकटांमुळे शेतक:यांचा हिरमोड झाला आहे. या नुकसानीची पाहणी करून अधिका:यांनी त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतक:यांतर्फे करण्यात येत आहे.
हळदाणी
नवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मेघ गजर्नेसह पावसाने आगमन केल्यामुळे गावात व परिसरात शेती कामांसह घर दुरूस्तीला वेग आला आहे.
जून महिन्याला सुरूवात झाल्याने आपापल्या शेतातील शेती कामांना सुरूवात केली होती. तसेच पाळीव प्राण्यासाठी लागणा:या चा:याची साठवण करीत होते. काही शेतका:यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, वखरणीची कामे सुरू केली आहे. तसेच यंदा बागायतीची कापसाच्या लागवडीला उशीर झाल्याचे बोलले जात आहे.