मोड शिवारात केळी पिकांचे होतेय नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:54 PM2019-01-04T12:54:25+5:302019-01-04T12:54:34+5:30
शेतक:यांचे नुकसान : तीसरी घटना, कारवाईची मागणी
बोरद : मोड ता़ तळोदा येथील केळी उत्पादक शेतकरी गोरख धनसिंग राजपूत, प्रवीणसिंग भटेसिंग राजपूत, प्रियंका उत्तम मराठे यांच्या शेतात लावण्यात आलेली केळीची झाडे अज्ञात माथेफिरुंकडून तोडण्यात आली आह़े गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अशा घटना सातत्याने घडताना दिसून येत आह़े
बुधवारी रात्री झालेल्या प्रथम घटनेत गोरख राजपूत यांच्या आष्टे शिवारातील सव्रे नंबर 65 मधील 17 केळीची झाडे विघAसंतोषींकडून तोडण्यात आली आह़े त्याच प्रमाणे प्रवीणसिंग राजपूत यांच्या सर्वे नंबर 18 मधील 11 केळीची झाडे कापण्यात आली आह़े तर प्रियंका मराठे यांच्या मोड लगतच्या सव्रे नंबर 4 मध्येही चार केळीची झाडे कापून टाकण्यात आली आहेत़ केळी उत्पादकांचे यातून मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े
मागील महिन्यातही प्रेमसिंग हिमंतसिंग राजपूत यांच्या शेतातील पपई पिकाची 27 झाडे कापून टाकण्यात आली होती़ त्याचाही शोध अद्याप लागला नसल्याने ठराविक गटातील माथेफिरुंकडून अशा प्रकारे शेतक:यांचे नुकसान करण्यात येत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े
दरम्यान घटनेची माहिती संबंधित शेतक:यांकडून बोरद पोलीस दूरक्षेत्राला कळविण्यात आली आह़े पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजय ठाकरे, एकनाथ ठाकरे, सूर्यवंशी आदी पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत़
वारंवार अशा प्रकारे चोरी तसेच पिकांची नासधूस होण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत़ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात केळी तसेच पपईचे क्षेत्र आहेत़ त्यामुळे अज्ञात माथेफिरुंकडून या ठिकाणी पपई व केळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यात येत असत़े केळी व पपई मुख्य पिक असल्याने यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े पोलीस कर्मचा:यांनी याकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े