सहा महिन्यात केळीचे भाव निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:55 PM2020-07-23T12:55:01+5:302020-07-23T12:55:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : वर्षाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांच्या केळीला ११ ते १२ रूपये प्रतिकिलो असा दर होता. तीच केळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : वर्षाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांच्या केळीला ११ ते १२ रूपये प्रतिकिलो असा दर होता. तीच केळी आता कोरोना संक्रमणकाळात अवघ्या पाच ते सहा रूपये किलो दराने विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेचा क्रेज न आल्याने पिकलेला माल बाजारात विकला गेला नाही. याशिवाय कोरोनाच्या धास्तीमुळे केळी खाण्याचे प्रमाणही कमी झाले होते. परिणामी केळीची मागणी घटली होती. शेतकºयांचा माल तोडणीला आला की, तोडावाच लागतो अन्यथा नुकसान होते. त्याच्याच परिणामी लॉकडाऊनच्या काळात तोडणी झालेल्या केळीचा शेतमाल शेतकºयांकडे तुंबला.
व्यापाºयांनी या स्थितीचा फायदा घेऊन हा माल अत्यल्प दरात खरेदी केला आणि पिकविण्याची प्रक्रिया करून बाजारात दामदुपटीने विक्री होत असतानाही व्यापाºयांनी शेतकºयांना दर दिला नाही .
दुसºया टप्प्यातील अनलॉकमुळे बाजारपेठ उघडल्या आता तालुक्यातील वाहतूक सुरू झाली. व्यापारी वर्षाच्या सुरूवातीला असलेला ११ ते १२ रूपये किलो दराने केळी खरेदी न करता अवघ्या पाच ते सहा रूपये दराने खरेदी करीत आहेत. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरातील रायखेड, खेड, सुलवाडे, सुलतानपुर, म्हसावद, पिंप्री, आवगे, जुनवणे, भागापूर, जवखेडा आदी गावातील शेतकरी सिंचन व्यवस्थेमुळे केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता. त्यामुळे केळी पिकाच्या क्षेत्रात सुद्धा वाढ झाली आहे.
लॉकडाऊन होण्याआधी मात्र तालुक्यातील हजारो टन केळी बेभाव विकली जात आहे. मार्च महिन्याचा लॉकडाऊन होण्यापासून एक रुपये किलोपासून आता पाच किलो दरापर्यंत केळी खरेदी होत आहे. नवीन आलेली केळी आता जास्तीत जास्त पाच रुपये किलो दराने तोडणी सुरू आहे. यामुळे लागलेला खर्चदेखील निघत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
शेतकºयांकडून पाच ते सहा रूपये किलोने खरेदी केलेल्या केळीची बाजारात १५ रूपये किलो दराने विक्री केली जात आहे. शेतकºयांकडून खरेदी करताना केळी किलोप्रमाणे खरेदी केली जाते. मात्र तीच केळी बाजारात डझनाप्रमाणे विकली जाते. एक डझनमध्ये दोन ते अडीच किलो केळी बसतात. ही केळी ३० ते ४० रूपये किलो डझनाप्रमाणे विक्री केली जात आहे.