करपा रोगामुळे केळी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:43 PM2019-01-20T12:43:37+5:302019-01-20T12:43:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात येण्याची भीती शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.
सध्या परिसरात गेल्या महिनाभरापासून थंडीने कहर केला आहे. जनजीवणाबरोबरच पिकांवर ही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ब्राrाणपुरी परिसरात केळी पिकाबरोबरच पपई पीक ही मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. केळी पिकाला जगवविण्यासाठी शेतकरी मोठय़ा प्रमाणात कसरत करत असतो. त्याच बरोबर पिकासाठी लाखो रुपये खर्च करून रात्र दिवस मेहनत घेऊन पिकाची मशागत करीत आहे. परंतु वाढत्या थंडीमुळे व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातचे पीक वाया जाण्याची भीती शेतक:यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच कधी नैसर्गिक संकट तर कधी समाज कंटकांमुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला होत असतो. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पहिल्यापासूनच शेतकरी संकटात सापडला आहे. त्याच बरोबर थंडीमुळे केळी पीक करपू लागले आहे. या थंडीमुळे पाने पिवळी पडणे, काळी पडणे, पाने फाटने आदींसह वाढही खुंटली आहे. अश्या प्रकारचे चित्र केळी पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा पावसानेदेखील दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, पावसाचा लहरीपणा व हवामानातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भावामुळे उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची चिंता शेतक:यानं मध्ये व्यक्त होत आहे. कृषी विभागाने ब्राrाणपुरी परिसरात केळी या पिकाची पाहणी करून शेतक:याना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.