बांद्रीयाबड परिसरात दुसरा बिबट्याही जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:09 PM2020-04-19T13:09:15+5:302020-04-19T13:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेतियापासून काही अंतरावरील बांद्रीयाबड व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार होता. ग्रामस्थांनी या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : खेतियापासून काही अंतरावरील बांद्रीयाबड व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार होता. ग्रामस्थांनी या बिबट्याला पकडण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. वनविभागाचे जोरदार शोधमोहीम राबवत या बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. आठवडाभरात वनविभागाने दुसरा बिबट्या पकडला आहे.
बांद्रीयाबड, ता.पानसेमल हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र सिमेवरील गाव आहे. या परिसरात बिबट्यांचा संचार असून नागरिकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने खरगोन, ता.शहादा रस्त्याच्या परिसरात कांतीलाल वेस्ता यांच्या शेताजवळ पिंजरा लावला. या पिंजºयात बिबट्या सकाळच्या सुमारास कैद झाला. परिसरात दोन बिबटे होते एक पकडला तर दुसºयाने तेथून पळ काढला होता. परंतु दुसºयाच दिवशी पुन्हा हा बिबट्या तेथे आला असता तो पिंजरयात कैद झाला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे त्या परिसरात नजर ठेवून बसले होते. त्यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी सकाळच्या सुमारास पिंजºयात बिबट्याला अडकलेला पाहिले. कैद झालेला बिबट्याला इंदूर येथील चिडियाघर (प्राणी संग्रहालय) येथे घेऊन जाणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले. सेंधवा वनविभागाचे अधिकारी श्रीराम मेहता, विजय गुप्ता, पानसेमल वनमंडळ अधिकारी मंगेश बुंदेला, खेतियाचे वनपरिक्षेत्र सहायक राजू पाटील, वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, मनोहर निगवाल, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून बांद्रीयाबड व परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यामुळे बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला केली होती. वनविभागाने सतर्क राहून आठवडाभरात दोन बिबटे कैद केल्याने नागरिकांमधील भीतची वातावरण दूर होण्यास मदत झाली आहे.