वंशजांच्या हस्ते बारगळ गढीचे पुजन : तळोदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:02 PM2018-02-26T13:02:56+5:302018-02-26T13:02:56+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : गड, किल्ले दिनाच्या पाश्र्वभूमीवर तळोदा येथील बारगळ वंशजांनी रविवारी येथील ऐतिहासिक बरगढ गढीचे विधिवत पूजन केले. तळोदा येथील बारगळ गढी सन 1662 मध्ये भोजराज बारगळ यांनी बांधली होती. सहा एकर क्षेत्रावर ही गढी उभी आहे.
जवळपास पावने चारशे वर्षाची परंपरा या गढीला लाभली आहे. या गढीने तळोद्याच्या सांस्कृतिक वैशिष्टयात भर पडली आहे. गढीची पूजा तिचे वंशज दर वर्षी विजयादशमीच्या दिवशी करीत असतात. मात्र यंदा गड, किल्ले दिनाच्या दिवशीही आपल्या गढीची पूजा करावी अशी सूचना पुणे येथील शिरदार वतनदारांनी सूचना जहागीरदार अमरराजे बारगळ यांना देण्यात आली होती. त्यामुळे या पाश्र्वभूमीवर रविवारी गढीच्या प्रवेशद्वाराचे भटजींच्या मंत्रोपचारने विधिवत पूजन बारगळच्या वंशजांनी केले. या वेळी अमरजीतराजे बारगळ, असिमकुमार बारगळ, धनंजय बारगळ, हृषिकेश बारगळ, डॉ़ देवीदास शेंडे यांच्यासह परिवार उपस्थित होता.